Wednesday, July 23, 2025
Home बॉलीवूड कान्स फिल्म फेस्टिवलमधील ऐश्वर्याच्या लूकची युजर्सने उडवली खिल्ली, ‘काेई मिल गया’च्या जादूशी केली तुलना

कान्स फिल्म फेस्टिवलमधील ऐश्वर्याच्या लूकची युजर्सने उडवली खिल्ली, ‘काेई मिल गया’च्या जादूशी केली तुलना

बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या साैंदर्याने सर्वांचे लक्ष वेधत आहे. खरे तर, ऐश्वर्या शुक्रवारी (दि. 19 मे)ला कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली. यावेळी अभिनेत्रीने सिल्वर रंगाचा गाउन परिधान केला हाेता, ज्यामध्ये तिचे डोके मोठ्या हुडीने झाकलेले होते. मात्र, ऐश्वर्याचा हाच लूक तिच्या चाहत्यांना आवडला नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला ट्राेल करायला सुरुवात केली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ऐश्वर्या राय (aishwarya rai bachchan) हिच्या हटके लूकने सर्वांचे लक्ष वेधले. खरे तर, ऐश्वर्याने सोफी कॉचरचा सिल्व्हर गाऊन परिधान केला होता, ज्यासोबत तिने एक मोठी चांदीची हुडी कॅरी केली. या हुडची खास गोष्ट म्हणजे हे हलके अॅल्युमिनियम वापरून बनवण्यात आले आहे.

ऐश्वर्याच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते यावर भन्नाट प्रतिक्रिया करत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘चिकन शावरमा अॅल्युमिनियम फॉइल दिसत आहे.’, तर दुसऱ्याने अभिनेत्रीची खिल्ली उडवत तिचा ड्रेस समोसासारखा दिसत असल्याचे सांगितले.

ऐश्वर्यापूर्वी सारा अली खान, ईशा गुप्ता, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेला यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक केला आहे. प्रत्येकाने आपल्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशात ऐश्वर्यानंतर अनुष्का शर्माच्या पदार्पणाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

ऐश्वर्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या राय शेवटची ‘पीएस 2’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर सुपरहिट असून या चित्रपटाते दिग्दर्शिन मणिरत्न यांनी केले आहे. ( Bollywood actress aishwarya rai bachchan reached to cannes red carpet actress look a like you have never look before)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ जोडप्यांमध्ये अतुट विश्वास; नावं पाहून तुम्हीही म्हणाल ‘जोडा असावा तर असा’
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा