Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड जगण्या- मरण्याची वचने दिल्यानंतरही ऐश्वर्या रायने केले ‘या’ कलाकारांसोबत ब्रेकअप; अभिषेकबरोबर थाटला संसार

जगण्या- मरण्याची वचने दिल्यानंतरही ऐश्वर्या रायने केले ‘या’ कलाकारांसोबत ब्रेकअप; अभिषेकबरोबर थाटला संसार

बॉलिवूड अभिनेत्री ‘ऐश्वर्या राय’ हिचे सौंदर्य आणि अभिनयाचा तर सगळा प्रेक्षकवर्ग चाहता आहे. अगदी बॉलिवूड स्टार्सपासून ते प्रेक्षकांपर्यंत जवळपास सर्वांचीच ऐश्वर्या क्रश आहे. ती तिच्या सौंदर्याने आणि मनमोहक अदाकारीने प्रत्येकालाच भूल पाडते. बॉलिवूडमधील अनेक नामांकित अभिनेतेही एकेकाळी ऐश्वर्याच्या प्रेमात बुडाले होते. अगदी जगण्या-मरण्याची वचने देखील त्यांनी एकमेकांना दिली होती. चला तर जाणून घेऊया ऐश्वर्याच्या या अफेअर्सबद्दल…

सलमान खान
ऐश्वर्या राय म्हटल्यावर प्रत्येकाच्या ओठावर नाव येतं, ते बॉलिवूडचा दबंग खान ‘सलमान खान’ याचे. सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेम कहाणीने तर सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या दोघांनी एकमेकांना जगण्या मरण्याची वचने दिली होती. या प्रेम कहाणीची सुरुवात ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटापासून झाली. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खान कधी ऐश्वर्या रायवर प्रेम करू लागला हे त्याला सुद्धा कळले नाही. त्यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये आले. परंतु सलमान खानच्या वागण्याला कंटाळून ऐश्वर्याने त्याच्याशी ब्रेकअप केले.

विवेक ओबेरॉय
एक काळ असा होता की, विवेक आणि ऐश्वर्या एकमेकांच्या बाबतीत खूपच सीरियस होते. त्या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला होता. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक एकमेकांसोबत होते. त्यांच्या या प्रेमाची सुरुवात ‘क्यू हो गया ना’ या चित्रपटापासून झाली. विवेकने ऐश्वर्याच्या 30 व्या वाढदिवसाला 30 गिफ्ट दिले होते.

राजीव मूलचंदानी
ऐश्वर्या राय आणि राजीव मूलचंदानी हे देखील एकेकाळी रिलेशनमध्ये होते. या दोघांची भेटही एका चित्रपटाच्या शूटींग दरम्यान झाली होती. दोघांचं नातं जास्त दिवस नाही टिकलं आणि त्यांनी ब्रेकअप केलं.

अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघेही बरेच दिवस रिलेशन मध्ये होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्न केले. आणि आता त्यांना मनावाची एक मुलगी देखील आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!

हे देखील वाचा