आलिया भट्टची गणना अतिशय सुंदर आणि हुशार अभिनेत्रींमध्ये केली जाते. आलियाही खूप विचारपूर्वक कपडे घालून मीडिया आणि चाहत्यांसमोर येते. मात्र, अलीकडेच आलियाकडून इतकी माेठी चूक झाली की, साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला चांगलेच ट्राेल करत आहेत. इंटरनेटवर लोक तिला ‘हिप्पोक्रेट्स’ म्हणत आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
एक काळ असा होता की, आलिया (alia bhatt) हिच्या जनरल नॉलेजची चांगलीच खिल्ली उडवली जायची, पण काळाच्या ओघात तिने त्यात बरीच सुधारणा करून दाखवली. सर्व प्रयत्न करूनही आलिया पुन्हा एकदा सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. आलियाचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे, ज्यात ती विमानतळावर ‘स्पीक अप फॉर अॅनिमल्स’ प्रिंट असलेला टी-शर्ट परिधान करून एका हातात लेदर बॅग घेऊन दिसत आहे, त्यामुळे साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला चांगलेच ट्राेल करत आहेत.
हा फोटो ऑक्टोबर 2021मध्ये क्लिक करण्यात आला होता. अशात आता याला रेडिट वर शेअर केले जात आहे. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हाइट ऑफ हिप्पोक्रेसी, स्पीक अप फॉर अॅनिमल्स टी-शर्ट परिधान करणारे लेदर बॅग घेऊन फिरत आहे”. यावर लोकांनी आलियाची खिल्ली उडवली आहे. अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘ऑड डेला प्राण्यांच्या सुरक्षेची चर्चा आणि ईवन डेला लेदर बॅग.’ तर दुसर्याने लिहिले, ‘इथे अॅनिमल म्हणजे रणबीर कपूरचा चित्रपट आहे.’
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर आलिया लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी रिलीज होणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त रणवीर सिंग, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.(bollywood actress alia bhatt brutally trolled for wearing speak up for animals t shirt while carrying leather bag people called her hypocrite)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनेक वर्षांनी मिनी माथुरने केला इंडियन आयडल सोडण्यामागील खरा खुलासा म्हणाली, ‘रियॅलिटी नसते…’
काय बात है! शाहरुख खानने जगभरातील अनेक दिग्गजांना पछाडत पटकावले ‘टाइम’च्या यादीत अव्वल स्थान