Saturday, July 6, 2024

नशिबाने कशी आज थट्टा मांडली! आलियावर आली रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला काॅपी करण्याची वेळ? लगेच वाचा

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा लूक कॉपी करण्यासाठी आलिया भट्ट पुन्हा एकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. मेट गालामध्ये दीपिकाच्या गाऊनची कॉपी केल्याचा आरोप केल्यानंतर आलिया भट्टवर पुन्हा एकदा दीपिकाच्या डेनिम जंपसूट लुकची कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रविवारी (दि. 14 मे) मदर्स डे साजरा केल्यानंतर, आलिया (alia bhatt) एका ग्लोबल लक्झरी ब्रँडचे लेटेस्ट कलेक्शन लॉन्च करण्यासाठी सिओलला रवाना झाली. अशात सिओलला रवाना होताना तिने जो लूक कॅरी केला होता त्याला तिच्या चाहत्यांनी दीपिकाची कॉपी म्हटले आहे. मात्र, मंडळी आलियावर दीपिकाची कॉपी केल्याचा आरोप पहिल्यांदाच लावण्यात आलेला नाही.

खरे तर, आलिया पांढरा शर्ट, निळ्या रंगाची डेनिम पँट आणि लांब डेनिम जॅकेट घातलेली दिसली. इतकेच नव्हे तर, यासाेबत अभिनेत्रीने ब्राउन हॅण्ड बॅग देखील हातात घेतली होती. मग काय दीपिका पदुकोणचा काही दिवसांपूर्वीचा लूक चाहत्यांना आठवला, जेव्हा ती डेनिम जंपसूटमध्ये विमानतळावर दिसली होती. अशात सोशल मीडिया युजर्स अभिनेत्रीचा चांगलेच ट्राेल करू लागले. एका युजरने कमेंट करत लिहिले की,’ती नेहमी दीपिकाची कॉपी का करते?’, तर आणखी एका व्यक्तीने लिहिले की, ‘दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक आलिया भट्टसाठी कामी आला नाही. असा पोशाख कॅरी करण्यासाठी, तश्या प्रकारे बॉडी फ्रेम देखील आवश्यक आहे.’

आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री ये गॅल गडॉटसोबत पहिला हाॅलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोनमध्ये’ दिसणार आहे. याशिवाय आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.(bollywood actress alia bhatt get troll over copying deepika padukone look again denim style)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट
अनुष्काने केली विराटला दुखवणारी गाेष्ट, नवऱ्याला साेडून बाॅडिगार्डसाेबत…

हे देखील वाचा