Saturday, June 29, 2024

मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलियाने घातला एक लाख मोत्यांचा ड्रेस, जाणून घ्या ड्रेसेची विशेषता

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालामध्ये पदार्पण केले आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, स्वत: आलियानेही तिचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि तिच्या गाऊनची विषेताही सांगितली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

आलिया (alia bhatt) हिने रेड कार्पेटवर व्हाइट गाऊनमध्ये एन्ट्री केली. यादरम्यान अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तिने ‘कार्ल लेजरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्युटी’ या थीमवर पांढरा गाऊन परिधान केला होता. अभिनेत्रीचा हा गाऊन प्रसिद्ध डिझायनर प्रबल गुरुंग यांनी डिझाइन केला आहे.

आलिया भट्टचा हा गाऊन मेड इन इंडिया असून तो एक लाख पांढऱ्या मोत्यांनी बनवला आहे. मोत्याबरोबरच त्यावर सुंदर नक्षीही करण्यात आली आहे. आलियाने तिच्या आकर्षक लूकची काही फाेटाे इंस्टाग्रामवर शेअर केली आणि लिहिले, “मेट गाला – कार्ल लेगरफेल्ड: ए लाइन ऑफ ब्यूटी. मी नेहमीच ‘चॅनेल ब्राइड्स’ची फॅन आहे. कार्ल लेजरफेल्ड आपल्या नाविन्यपूर्ण ड्रेसने कायमच मन जिंकत आले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया पुढे म्हणाली, “माझा लूक आज रात्रीचा यानेच प्रेरित हाेता आणि विशेषत: सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या 1992च्या चॅनेल ब्राइडल लुकने प्रेरित झाला आहे. मला ऑथेंटिक आणि भारतात बनवलेले कपडे घालायचे होते. एक लाख मोत्यांनी केलेली भरतकाम हे प्रबल गुरुंग यांच्या मेहनतीचे फळ आहे. मला अभिमान आहे की, मी माझ्या पहिल्या मेटसाठी हे परिधान केले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

आलियाने मॅचिंग ग्लोव्हज, यूनिक इयररिंग्स आणि अनेक अंगठ्यासह तिचा लूक पुर्ण केला. तिच्या हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने मिडल पार्टिंगसह खूप ग्लॅमरस लूक दिला. आलिया कमीतकमी मेकअप, स्मोकी आय शॅडो, कोहल-रिम्ड आईज, ब्लश्ड चीकबोन्स, न्यूड लिप शेडमध्ये जबरदस्त दिसत होती. (bollywood actress alia bhatt met gal gown made of one lakh pearls )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल
पद्मिनी कोल्हापुरेसोबत नीतू कपूरने केला ‘नाटू – नाटू’ गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा