Friday, July 5, 2024

‘सात समुंदर पार…’ गाण्यावर अनन्यासह थिरकले चंकी पांडे, बापलेकीची भन्नाट जाेडी एकदा पाहाच

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिने मुंबईत आयव्हर मॅक्रॉनसोबत लग्नगाठ बांधली. अशात अनन्याने गुरुवारी (दि. 16 मार्च)ला तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर लग्न समारंभातील व्हिडिओ शेअर केले. या लग्नसोहळ्यात अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रीने निळ्या आणि पांढऱ्या रंगाची नक्षी असलेली साडी परिधान केली होती. त्याच वेळी, अभिनेत्रीची आई भावना यांनी देखील लग्नात सोनेरी नक्षीकाम केलेली साडी नेसली होती आणि अभिनेता चंकी पांडेने पांढऱ्या पॅंटसह पोपटी रंगाचा ब्लेझर घातला होता.

अशात अलानाच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अनन्या तिचे वडील चंकी आणि चुलत भाऊ अहानसोबत ‘सात समुद्र पा’र या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

मंडळी, आम्ही तुम्हाला सांगतो की, अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि त्याची पत्नी डीन पांडे यांची मुलगी आहे. ती एक मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. अलानाने 2021 मध्ये तिचा बॉयफ्रेंड आयव्हरशी साखरपुडा केला. आयव्हर आणि अलाना अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आयव्हरचे यूट्यूब चॅनल आहे आणि तो लॉस एंजेलिस, यूएसए येथे राहतो. आयव्हरचे इंस्टाग्रामवर खूप मोठे फॉलोअर्स देखील आहेत आणि तो त्याच्या चाहत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि मनोरंजन करण्यासाठी व्हिडिओ बनवत असताे.

अनन्या पांडे लवकरच विक्रमादित्य मोटवाने यांच्या सायबर क्राईम-थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्याही मुख्य भूमिका आहेत. यासोबतच अनन्या आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ या कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव, अन्नू कपूर, मनोज जोशी आणि विजय राज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 7 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.(bollywood actress ananya pandey dance on saat samunder paar song with father chunky pandey at alanna panday ivor mccray wedding)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे वा! दृश्यम फेम अभिनेत्री लवकरच होणार आई, बेबी बंपसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

नकारात्मक भूमिका करूनही चाहत्यांचे मिळणारे प्रेम पाहून भारावलेल्या मिलिंद गवळी यांनी शेअर केली ‘ती’ पोस्ट

हे देखील वाचा