आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख सध्या चित्रपटापासून दूर आहे. परंतु असे असले तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकताच तिने आपल्या दोन मुलांसोबतचा म्हणजेच रियान आणि राहिल यांच्यासोबत मजामस्ती करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जेनेलियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत मातृत्वाबद्दल खास गोष्ट सांगितली आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
या व्हिडिओत ती बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘मैं तेरा बॉयफ्रेंड’ या गाण्यावर मुलांसोबत मजामस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने खूपच गोड गोष्ट लिहिली आहे. तिने लिहिले की, “आई बनल्यानंतर तुम्हाला जाणीव होते की, तुम्ही सहजपणे, मनापासून आणि सतत आपल्या मुलांना स्वत:च्या आधी प्राथमिकता देता.”
यासह तिने हार्ट इमोजी शेअर करत लिहिले की, “मुलं अशीच असतात. प्रत्येक मूड माफ करणारे, प्रत्येकवेळी त्यांना तुमची आवश्यकता असते. तसेच ते हाच विचार करतात की, ‘आई बरोबर आहे.'” पुढे तिने सर्व आईंना सल्ला देताना म्हटले की, “मला माहिती आहे की, मी एक आई म्हणून परिपूर्ण नाही, एकदम बरोबरही नाही, मला ठेच लागते, पडते, परंतु जेव्हा माझ्या मुलांना माझी आवश्यकता असते, तेव्हा त्यांची काळजी माझ्यापेक्षा इतर कोणी नाही घेणार. त्यामुळे मी सर्व आईंना सांगेल की, तुम्ही सर्वोत्तम आहात आणि कोणाच्याही सांगण्याने तुम्ही कोणताही विचार करू नका.”
जेनेलिया बॉलिवूडमध्ये चांगल्याप्रकारे तळ ठोकून काम करत होती. परंतु आपले कुटुंब आणि मुलांना सांभाळण्यासाठी ती खूप काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. तरीही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नुकतेच जेनेलिया आणि रितेशने आपल्या लग्नाचा ९ वा वाढदिवस साजरा केला. या खास क्षणी त्यांनी आनंदात वेळ घालवला.
चित्रपटांबाबत जेनेलियाचे असे म्हणणे आहे की, ती पुनरागमन करण्याबाबत विचार करत आहे. ती म्हणाली की, “ज्यावेळी मी हा निर्णय घेतला होता की, मला सेटल व्हायचे आहे, त्यावेळी मला माहिती होते की मला रितेश आणि माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. परंतु माझी मुलं आता इतके मोठे झाले आहेत की, मी पुन्हा एकदा आपली कारकीर्द सुरू करू शकते.”
जेनेलिया रितेशसोबत सन २०१२ साली ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. हा चित्रपट हिट ठरला होता.
हेही वाचा-
रितेशभाऊ-जेनेलिया वहिनींचा झिंगाटवर ‘सैराट’ डान्स, कोणी बेधुंद होऊन नाचतंय तर कोणी जमिनीवर पडतंय…