थेट इंग्रजी गाण्यावर डान्स करत अंकिताने वाढवला इंटरनेटचा पारा, कौतूक करताना चाहतेही घेत नाहीत थांबायचं नाव


अंकिता लोखंडे ही अशा तार्‍यांपैकी एक आहे, जिला आपल्या कामासह सोशल मीडियावर वेळ घालवायला आवडते. टीव्ही इंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करणारी अंकिता लोखंडे सतत आपल्या पोस्टसाठी चर्चेत असते. अंकिता लोखंडेने पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती इंग्रजी गाण्यावर नाचताना दिसत आहे. अंकिता लोखंडेच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अंकिताने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जे लोक नाचतात ते सहसा स्वत: चा सन्मान करत असतात आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवतात.” अंकिता लोखंडेचा हा डान्स व्हिडिओ आतापर्यंत 11 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चाहते तिच्या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

अंकिता लोखंडेने तिच्या अशा डान्स व्हिडिओद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती ‘लाल इश्क’ गाण्यावर थिरकताना दिसली होती.

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या शोमधून टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केले होते. या शोमध्ये अंकिता आणि सुशांतसिंग राजपूत मुख्य भूमिकेत होते. पवित्र रिश्ताशिवाय अंकिता ‘एक थी नायिका’ आणि ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

गेल्या वर्षी अंकिता लोखंडेने कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘बागी 3’ मध्ये देखील काम केले आहे. अंकिता लोखंडे ‘झलक दिखला जा’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ सारख्या टीव्ही रियलिटी शोमध्येही दिसली आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.