Monday, July 1, 2024

मुंबईत फॅशन वीकमध्ये अंशुलाचा रॅम्प वाॅक पाहून अर्जुन कपूरचा आनंद अनावर, व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर व्यावसायिक आयुष्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांच्यातील प्रेम फिल्म इंडस्ट्रीत कोणापासूनही लपलेले नाही. दोघेही प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. अर्जुन अनेकदा सोशल मीडियाद्वारे आपल्या बहिणीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. अशात नुकतेच अर्जुनची लाडकी बहीण अंशुलाने रॅम्पवर तिची जादू दाखवली आहे. जे पाहून अर्जुनला स्वतःला सावरता आले नाही आणि त्याने सर्वांसमोर आपला आनंद व्यक्त केला.

अंशुला कपूर (anshula kapoor) हिने नुकतेच मुंबईतील फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यादरम्यान अर्जुन ( arjun kapoor) आपल्या बहिणीला प्राेत्साहीत करण्यासाठी पाेहचला. आपल्या बहिणीला रॅम्पवर चालताना पाहून अर्जुनच्या आनंदाला पारावार उरला नाही. अंशुला स्टेजवर येताच अर्जुन जोरदार टाळ्या वाजवताना आणि त्याच्या खुर्चीवर उभा राहून  बहिणी अंशुलाला चीयर करताना दिसत आहे. हे पाहून अंशुलासोबत उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.अंशुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अंशुलाच्या व्हिडिओवर साेनम कपूरने केली कमेंट
अंशुला कपूरने मुंबईतील फॅशन वीकमध्ये शिमरी ड्रेस परिधान करून आग लावली. अंशुला कपूर या चमकदार ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. तिचा हा ड्रेस शिमरी आणि ट्रांस्पेरेंट हाेता. अंशुलाने या ड्रेससाेबत तिचे केस खुले साेडले हेाते, ज्यामुळे ती आणखी सुंदर दिसत हाेती. अंशुलाच्या रॅम्प वॉकच्या व्हिडिओवर चाहत्यांसाेबत कलाकारही भिन्नभिन्न कमेंट करत आहे. सोनम कपूरने कमेंट करत लिहिले की, ‘अंशुला तुझ्यावर अभिमान आहे.’ (bollywood actress anshula kapoor walks the ramp for fashion week brother arjun kapoor cheers sister video goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एयरपोर्ट लूकमध्ये दिसलेला सिद्धार्थ मल्होत्रा ‘या’ कारणामुळे झाला सोशल मीडियावर ट्रोल

संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं’ नाटकाच्या प्रयोगाला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने लावली हजेरी

हे देखील वाचा