Friday, April 18, 2025
Home मराठी एकेवेळी रेखाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी अभिनेत्री आज जगतेय असं आयुष्य

एकेवेळी रेखाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी अभिनेत्री आज जगतेय असं आयुष्य

बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचंच नशीब काही चमकत नाही. इथं बरेच लोक अनामिकतेच्या अशा अंधारामध्ये हरवतात की पुढील काही वर्षे त्यांना कुणी विचारतही नाही. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री होती अनुराधा पटेल. बर्‍याच चित्रपटांमध्ये अभिनय करूनही तिने स्वतःला कालांतराने लाइम लाइटपासून दूर नेलं.

मुंबईत जन्मलेल्या अनुराधा पटेल एका चित्रपट क्षेत्रात काम करत असलेल्या कुटुंबातील आहेत. त्या प्रसिद्ध अभिनेता अशोक कुमार यांच्या नात आहेत. १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन गोवा’ चित्रपटाने त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांच्या कामाचं फार कौतुक झालं होतं.

अनुराधा यांनी रेखाबरोबर पुढच्याच वर्षी अर्थात १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या उत्सव चित्रपटात काम केलं होतं. त्यांनी या चित्रपटात रेखाच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचं ‘मन क्यूँ बहका रे बहका’ हे गाणं लोकांना खूप भावलं. आजही हे गाणं अक्षरशः  लोकांना तोंडपाठ आहे इतकी या गाण्याची प्रसिद्धी आहे.

अनुराधा पुन्हा एकदा १९८७ च्या ‘इजाजत’ या चित्रपटात रेखासोबत दिसली. या चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है।’ या गाण्याने त्यांना प्रचंड प्रसिद्धी दिली. या चित्रपटांव्यतिरिक्त ती सदा सुहागन, धर्म अधिकारी, रुखसत या चित्रपटांमध्ये दिसली.

चित्रपटांशिवाय अनुराधा यांनी काही मालिकांमध्येही काम केलं. यासोबतच ती बर्‍याच मोठ्या जाहिरातींमध्येही दिसली. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘रब्बा में क्या करु’ या चित्रपटामध्ये त्या अखेरच्या दिसल्या होत्या. अनुराधा मुंबईत व्यक्तिमत्व विकास संस्था देखील चालवतात.

चित्रपटांमध्ये काम करत असताना अनुराधा अभिनेता कंवलजितसिंगच्या प्रेमात पडल्या आणि मग त्यांचं लग्न झालं. आज अनुराधा आणि कंवलजीत यांना तीन मुलं देखील आहेत.

हे देखील वाचा