Monday, July 1, 2024

अर्रर्र! हे काय झालं वाढदिवसाच सरप्राईज द्याला गेली अन् कंबर ताेडून बसली

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे लाेकप्रिय जाेडप्यापैकी एक आहेत. हे दाेघेही एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची आणि एकमेकांची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 5 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेटर विराट काेहलीच्या वाढदिवसानिमित्त, अभिनेत्रीनं एक खास व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल हाेत आहे आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

व्हिडिओमध्ये, अनुष्का (anushka sharma) विराट कोहली (virat kohli) याला सरप्राइज देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, ज्यामध्ये ती पूर्णपणे अपयशी ठरते. एकीकडे जिथे विराट कुठे झोपला आहे, तर दुसरीकडे अनुष्का त्याच्यासाठी फ्रीजमधून केक काढते. मात्र, त्यादरम्यान ती ड्रॉवरमधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करते आणि अडकते. ते उघडण्याचा प्रयत्न करत असताना अनुष्का केकसह पडते.

आवाज ऐकून विराटही झाडू घेऊन स्वयंपाकघरात येतो आणि पाहतो की, अनुष्का केकसह खाली पडली आहे. व्हिडिओ शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले, “मला नेहमी वाटायचे की, सरप्राईज देणे सोपे काम आहे, पण या खराब इंटीरियरने माझे सरप्राईज खराब केले. खराब दर्जाच्या फिटिंगला तुमच्या खास दिवसावर परिणाम हाेऊ देऊ नका. लिव स्पेससह हे सोपे करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

खरं तर, ही एका इंटिरियर डिझायनर कंपनीची जाहिरात होती, जी कंपनीने विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त जारी केली होती. तर दुसरीकडे अनुष्काने विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक अतिशय सुंदर पाेस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या पतीचे अनेक मजेदार फोटो शेअर केले आहेत आणि वाढदिवसाची एक मजेदार पोस्ट देखील लिहिली आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले , “माझ्या प्रिय, आज तुझा वाढदिवस आहे आणि अर्थातच, मी या पोस्टसाठी तुझे सर्वोत्तम अँगल पिक्चर्स निवडले आहेत. प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक रूपात मी तुझ्यावर प्रेम करते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

या पोस्टमध्ये तिने किंग कोहलीला टॅग केले आणि हार्ट इमोजीही टाकले. एका फाेटाेत विराटने वामिकाला आपल्या हातात धरलेले असून कॅमेऱ्याकडे पाहत पोझ देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना अनुष्काने वामिकाचा चेहरा लपवला आहे. विराट आणि अनुष्काने 2017 मध्ये लग्न बधंनात अडकले आणि आणि 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिकाचे स्वागत केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर शेअर केला पहिलाच फोटो, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

धक्कादायक! मुलीला जन्म दिल्यानंतर आलियाच्या तब्येती बदल, वाचा सविस्तर

हे देखील वाचा