Monday, October 14, 2024
Home अन्य आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर शेअर केला पहिलाच फोटो, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर शेअर केला पहिलाच फोटो, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

बॉलिवूडची लोप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांनी बाळ जन्माला येण्यापूर्वीच अनेक गोष्टीच्या तयारी सुरु केल्या होत्या. रविवार (दि. 06 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 7:30 च्या सुमारास अभिनेत्रीला रिलायंस दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. यानंतर तिने दुपारी 1 वाजता एका चिमुरडीला जन्म दिला. त्यामुळे आलियाने नुक्तच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे, सध्या कपूर कुटुंबीयाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यामध्येच आलियाने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर नुकतंच आई होण्याच्या आनंदामध्ये एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसून येत आहे की, त्यामध्ये तिने सिंहाचे कुटुंब दाखवले आहे, ज्यामध्ये आई, बाबा, लहान बाळ सिंह दिसत आहे. अशा प्रकारचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि आमचं बाळ आलं आहे आणि ही एक मॅजिक गर्ल आहे. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्यार, प्यार, प्यार, रणबीर आणि आलिया.”

 

View this post on Instagram

 

माध्यमातील वृत्तानुसार आलिया भट्टचे सिजर डिलेव्हरी झाली आहे. अभिनेत्रीच्या आई बनण्यच्या आनंदामध्ये सध्या कपूर कुटुंबीयामध्ये आनंदाचा मोहोत्सव सुरु झाला आहे. आजी नितू कपूर (Nitu Kapoor) देखिल या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होती. रणबी कपूर (Ranbir Kapoor) याला आधीपासूनच लहान मुलांची खूप आवड आहे आणि आता तर तो स्वत: एका मुलीचा बाप बनला आहे, तर हा क्षण त्याच्यासाठी खूपच मोलाचा बणला आहे. पहायाल गलं तर माहितानुसार आलिया नोव्हेंबरच्या शेवटी आई होणार होती पण तिने नुकतंच बाळाला जन्म दिला. चाहते देखिल सोशल मीडियावर फोटो आणि कमेंट शेअर करुन अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्टार किड्सचा जलवा! ‘या’ कलाकारांनी स्वतःच्या कमाईवर घेतलेत आलिशान बंगले
लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी गौतमी पाटीलवर केली टिका; म्हणाली,’परकर वर करेन अन् पाण्याची…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा