बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी लग्न बंधनात अडकली आहे. 23 जानेवारी 2023 रोजी अथिया शेट्टीने भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत सात फेऱ्या घेतल्या. लग्नाआधीही दोघेही त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत हाेते. अशात आता सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलचा एक क्यूट व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुलची बॉन्डिंग पाहायला मिळत आहे.
क्रिकेटर केएल राहुल ( kl rahul) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सध्या तो त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकामागून एक त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. दरम्यान, केएल राहुलने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते खूप खुश दिसत आहेत. केएल राहुलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो अथियाला किस करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये केएल राहुल आणि अथिया (athiya shetty) खूप मस्ती करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत तर काही चाहते दोघांचेही कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंट केली, ‘बॉलिवूडचे सर्वात क्यूट कपल…’ त्याचवेळी दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘तुम्हा दोघांची जोडी सुरक्षित राहो.’
View this post on Instagram
अथिया शेट्टी हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘हिराे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती ‘मोतीचूर चकनाचूर’,’मुबारकन’ यासारख्या चित्रपटात दिसली. (bollywood actress athiya shetty and kl rahul kiss video went viral on social media entertainment news )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अथिया अन केएल राहुलने केले पायजमा आणि बाथरोबमध्ये फोटोशूट; लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले मॅगझिन कव्हरवर
आईच्या निधनानंतर रडताना दिसली राखी सावंत; म्हणाली, ‘माझं लग्न धोक्यात…’