Friday, March 29, 2024

अथिया अन केएल राहुलने केले पायजमा आणि बाथरोबमध्ये फोटोशूट; लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले मॅगझिन कव्हरवर

बाॅलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल 23 जानेवारीला लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात त्यांनी अनेक डिसायनर कपडे परिधान केले हाेते. अशात आता दोघांनी एका मॅगझीन कव्हरसाठी फोटोशूट केले आहे, ज्याचा फाेटाे अथियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जे साेशल मीडियावर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

अथियाचा लग्नानंतरचा पहिला कव्हर फाेटाेशूट
हे फाेटाेशूट अथिया (athiya shetty) आणि केएल राहुल (kl rahul) यांनी लग्नाआधी केल्याचे वृत्त आहे. लग्नानंतर रिलीज झालेला अथियाचा हा पहिला कव्हर फोटो आहे. यात दोघेही पायजमा आणि बाथरोब परिधान केलेले दिसत आहेत. अथिया शेट्टी लेटेस्ट फोटोमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिने हिरवा चेकर्ड पायजमा आणि पांढरा बाथरोब घातला आहे. दोघांनी वोग इंडियासाठी हे फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट डिजिटल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VOGUE India (@vogueindia)

अथियाने साेशल मीडियावर शेअर केले लग्नाचे फाेटाे
अथिया शेट्टी आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत हाेते. दोघांनीही आपले नाते गोपनीय ठेवले. अशात अखेर हे जाेडपे यावर्षी लग्न बंधनात अडकले. यावेळी अथियाने एम्ब्रॉयडरी केलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, ज्याचे फोटो अथियाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

‘हिराे’ चित्रपटातून अथियाने केले सिनेसृष्टीत पदार्पण
अथिया शेट्टी हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘हिराे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती ‘मोतीचूर चकनाचूर’,’मुबारकन’ यासारख्या चित्रपटात दिसली. (bollywood actress athiya shetty and kl rahul after marriage done photoshoot for magazine cover in pajamas and bathrobe pics goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
ओटीटी प्लॅटफॉर्मवर जास्त सर्च केला जाणारा अभिनेता बनला किंग खान, ‘या’ मालिकेने पटकावले पाहिले स्थान

वनिता खरातला लग्नात मिळाली खास भेट, प्राजक्ता माळी व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा