Wednesday, June 26, 2024

लग्नापूर्वी सलूनबाहेर दिसली अथिया शेट्टी, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील चमक पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री अथिया शेट्टी सध्या तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे सतत चर्चेत असते. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्री लवकरच क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दोन्ही घरांची सजावटही सुरू झाली आहे. दरम्यान, बुधवारी  (दि. 18 जानेवारी)ला अथिया एका सलूनमधून बाहेर पडताना दिसली. एका पॅपराझींने तिचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत.

व्हिडिओमध्ये अथिया (athiya shetty) सलूनमधून बाहेर पडताना आणि पटकन कारमध्ये बसताना दिसत आहे. ती बाहेर येताच पॅपराझींने तिला कॅमेऱ्यात कैद केले. व्हिडिओमध्ये अथिया हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. या दरम्यान तिच्या चेहऱ्यावर एक चमकही दिसून येते. कमीत कमी मेकअपसह अथियाचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला आहे. या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तिचा चेहरा खूप चमकत आहे.”, तर दुसऱ्या यूजरने लिहिले, “ती खूप सुंदर दिसत आहे.” याशिवाय अनेक युजर्स या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजीही टाकत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

माध्यमातील वृत्तानुसार, अथिया आणि केएल राहुल 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यासाठी दोन्ही कुटुंबात जोरदार तयारी सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नाचे फंक्शन तीन दिवस चालणार आहे. अथिया आणि केएल राहुल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघेही त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र, लग्नाबाबत दोन्ही बाजूंकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

अथियच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘माेतीचूर चकनाचूर’, ‘नवाबजादे’, ‘मुबारकां’, ‘हीराे’ यासारख्या चित्रपटांमध्य कामे केले आहे.(bollywood actress athiya shetty spotted outside salon ahead of wedding with kl rahul see viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भांडं फुटलं रे! तुषार कालियाने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, फाेटाे झाले व्हायरल

सतत टीव्हीवर ‘सूर्यवंशम’ पाहून वैतागलेल्या पठ्याने थेट लिहिले चॅनेलाच पत्र, म्हणाला…

हे देखील वाचा