Wednesday, June 10, 2026
Home टेलिव्हिजन भांडं फुटलं रे! तुषार कालियाने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, फाेटाे झाले व्हायरल

भांडं फुटलं रे! तुषार कालियाने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, फाेटाे झाले व्हायरल

खतरों के खिलाडी 12‘ चा विजेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर तुषार कालिया त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असताे. अशातच त्याने आपल्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू केला आहे. तुषार कालियाने त्याची गर्लफ्रेंड त्रिवेणी बर्मनसोबत लग्न केले आहे. तुषार कालिया आणि त्रिवेणी बर्मन यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

खरंतर तुषार (tushar kalia) यानेच सोशल मीडियावर गर्लफ्रेंड त्रिवेणी (triveni barman) सोबत लग्नाची घोषणा केली हाेती. तुषार कालियाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्रिवेणी बर्मनसोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही वधू आणि वरच्या रुपात खूपच क्यूट दिसत आहेत. फाेटाेत हे विवाहित जोडपे एकमेकांच्या प्रेमात बुडलेले दिसत आहे. तुषारने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘धन्य.’

 

View this post on Instagram

 

A post shared by fan tushar Kalia (@thetusharkalia_86)

तुषार कालिया आणि त्रिवेणीच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर तुषारने शेरवानी परिधान केलेली असून पगडी घातली आहे. तर दुसरीकडे, लाल वेडिंग ड्रेसमध्ये त्रिवेणी बर्मन खूप सुंदर दिसत आहे. लग्नाचे फोटो समोर येताच सर्व सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. भारती सिंग आणि अर्जुन बिजलानी यांनीही तुषारला या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by fan tushar Kalia (@thetusharkalia_86)

तुषार कालियाची पत्नी त्रिवेणी बर्मन एक मॉडेल आहे. 2021 मध्ये दोघांची भेट झाली आणि दोघे ऐकमेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर दाेघेही एकमेकांना डेट करू लागले. गेल्या वर्षी मार्चमध्ये तुषारने अधिकृतपणे तो आणि त्रिवेणी रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती. बराच काळ डेट केल्यानंतर आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. (khatron ke khiladi 12 winner tushar kalia got married with triveni barman shares his wedding photos goes viral 2023)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्या मालिकेने घराघरात मिळाली प्रसिद्धी त्यानेच केले बेघर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा

रितेश देशमुख आणि जिनिलीया यांच्याकडून ‘वेड तुझे’ गाण्यातून प्रेक्षकांना देणार खास ट्रीट

हे देखील वाचा