Monday, February 26, 2024

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये भाग्यश्री-भूमिका चावलाची एन्ट्री?

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमानचे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत, पण बऱ्याच काळापासून या चित्रपटाबाबत कोणतेही नवीन अपडेट्स समोर आले नसल्यानं त्याचे चाहते चांगलेच निराश झाले हाेते. मात्र, आता या चित्रपटाबाबत जे नवीन अपडेट्स समोर आले आहेत ते जाणून चाहत्यांना सुखद धक्काच बसेल. माध्यमांतील वृत्तानुसार, सलमानसाेबत या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री भाग्यश्री आणि भूमिका चावला देखील दिसणार आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटाच्या कास्टिंगचे काम वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत आणखी दोन अभिनेत्रींचा चित्रपटात प्रवेश झाला आहे. वृत्तांमध्ये सांगण्यात आले आहे की, “ज्या दोन अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत, त्यापैकी पहिले नाव सलमान (Salman Khan) याचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ची को-स्टार भाग्यश्री (Bhagyashree) आणि दुसरे नाव आहे ‘तेरे नाम’ चित्रपटाची को-स्टार भूमिका चावला आहे. भाग्यश्री आणि भूमिका चावला (Bhumika Chawla ) ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम करताना दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये अनेक वेळा कास्टिंगमध्ये बदल केले आहेत. याआधी पूजा हेगडे, जस्सी गिल, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, विजेंदर सिंग दग्गुबती व्यंकटेश आणि जगपती बाबू यांची नावे चित्रपटात जोडली गेली आहेत. सलमानचा हा आगामी चित्रपट ऍक्शनने भरलेला असून 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे.

या चित्रपटा व्यतिरिक्त सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, सलमान ‘टायगर 3’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. मनीष शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (bollywood actress bhagyashree and actress bhumika chawla are also join salman khan film kisi ka bhai kisi ki jaan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ यांचे ‘बच्चन’ आडनाव पडले तरी कसे? रंजक आहे किस्सा

अंकिताने सॅटिन ड्रेसमध्ये केलं फोटोशूट, पाहा अभिनेत्रीचा जलवा

हे देखील वाचा