Friday, July 12, 2024

काय सांगता! कॅटरिनाने सलमानला शिकवला डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

छाेट्या पडद्यावरिल प्रसिद्ध शाे ‘बिग बॉस 16‘ च्या पुढील एपिसोडमध्ये सलमान खान ‘फ्रायडे का वार’मध्ये कॅटरिना कैफ सोबत डान्स करताना दिसणार आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, कॅटरिना सलमानला ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील  तिच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या हिट ट्रॅकच्या डान्स मूव्ह्स शिकवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, सलमान कसा तरी कॅटरिनाची कॉपी करण्यात यशस्वी झाला, परंतु त्याची शैली खूपच मजेदार आहे. 

कॅटरिनाने सलमानला शिकवल्या हुक स्टेप्स
व्हिडिओमध्ये, कॅटरिना (katrina kaif) पिवळा बॉडीकॉन ड्रेस परिधान करताना दिसत आहे तर सलमान खान (salman khan) काळ्या पॅंट आणि काळ्या शूजसह काळ्या शर्टमध्ये दिसत आहे. कॅटरिनाने गाण्याच्या हुक स्टेप्स शिकवल्या, तर सलमाननेही फार मजेशीर पद्धतीने त्यांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही गाण्यासोबत लिप सिंक केले.

‘टायगर 3’ चित्रपटात कॅटरिना आणि सलमान शेअर करणार स्क्रिन
कॅटरिना आणि सलमानने ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘मैने प्यार क्यूं किया’ आणि ‘भारत’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर 3’साठी दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत. हा चित्रपट 2023 च्या दिवाळीला रिलीज होणार आहे.

‘फाेन भूत’ चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
सलमान खानच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले तर, सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त शहनाज गिल, राघव जुयाल आणि पूजा हेगडे महत्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 30 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे तर कॅटरिना ‘फाेन भूत’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कॅटरिना व्यतिरिक्त ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तिचा हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अरे वाह! दिल्लीत 4 नोव्हेंबरपासून EU चित्रपट महोत्सव, 23 भाषांमध्ये 27 देशांतील चित्रपट पाहण्याची संधी
दीपिका जिममध्ये कसा गाळते घाम? कॅटरिना कॅफने व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

हे देखील वाचा