Monday, July 1, 2024

बिपाशा बसूने दाखवली बाप-लेकीच्या प्रेमाची झलक, एकदा फाेटाे पाहाच

बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नेंसीदरम्यान तिच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगायची. कधी ती तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे फोटो शेअर करायची, तर कधी बाळाच्या स्वागताच्या तयारीची झलक दाखवणारे व्हिडिओ पोस्ट करायची. बिपाशाच्या मुलीच्या जन्माला दोन महिने उलटले आहेत, परंतु तिने अद्याप चाहत्यांना लहान बाळाचा चेहरा दाखवलेला नाही, परंतु आता तिने करण सिंग ग्रोव्हरसोबतचा मुलीचा एक गोंडस फोटो पोस्ट केला आहे.

बिपाशा बसू (bipasha basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (karan singh grover) त्यांच्या मुलीसोबत त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षणांचा आनंद घेत असल्याचे फाेटाेत स्पष्ट होतं आहे. मुलगी वडील करणच्या खांद्यावर बसली आहे. मात्र, येथे अभिनेत्रीने मुलीचा चेहरा लपवला आहे. फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये बिपाशाने लिहिले आहे की, ‘देवीचे वडील.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

देवीने हेअरबँडसह गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातला आहे. बिपाशाने बाळाचा चेहरा लपवण्यासाठी हार्ट इमोजीचा वापर केला आहे. 44 वर्षीय बिपाशाने 2016 मध्ये करणसोबत लग्न केले, पण सुरुवातीला अभिनेत्रीचे पालक या लग्नाच्या विरोधात होते, कारण करण सिंग ग्रोवरचे दोन लग्न मोडले होते.

bipasha basu baby photo
Photo Courtesy: Instagram/bipashabasu

40 वर्षीय अभिनेत्याने प्रथम श्रद्धा निगमशी लग्न केले हाेते, त्यानंतर जेनिफर विंगेटला आपली जीवनसाथी बनवले. माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत बिपाशा म्हणाली होती की, ‘अयशस्वी लग्नाचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती चुकीची असेल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बसू हिच्या विषयी बाेलायचे झाले, तर तिने 2001 मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. बिपाशाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये ‘नो एंट्री’, ‘धूम 2’, ‘राज’ आणि ‘अपहरन’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.(bollywood actre`s`s bipasha basu daughter devi sitting on father karan singh grover shoulder fans love actress baby new photo )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सबाच्या ‘या’ गाेष्टीवर आले ऋतिकचे मन! ट्विटरवरून सुरू झाली लव्हस्टोरी, अशी आहे संपूर्ण कहाणी

बाथरूमच्या भिंतीतून बाहेर आले नोटांचे बंडल; प्रश्न उपस्थित झाल्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘वेश्याव्यवसाय करून…’

हे देखील वाचा