जेव्हा मध्यरात्री गुंडांनी केला होता पाठलाग, अभिनेत्री बिपाशा बसूने सांगितला जिवावर बेतलेला प्रसंग

बॉलिवूड कलाकारांचे अनेक गाजलेले किस्से नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत येत असतात. अनेक मुलाखतीत अभिनेत्री त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडलेले किस्से सांगत असतात. असाच एक किस्सा अभिनेत्री बिपाशा बासूसोबतही घडला होता. ज्याचा तिने एका मुलाखतीत उल्लेख केला होता. काय होता तो रंजक किस्सा चला जाणून घेऊ. 

बिपाशा बासू (Bipasha Basu) ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओखळली जाते. सध्या ती सिनेजगतापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच चर्चेत असते. बिपाशा बसू  अभिनेता जॉन अब्राहमसोबतच्या नात्यामुळे बरीच चर्चा केली आहे. एक काळ असा होता की बिपाशा आणि जॉन लग्न करणार याची सर्वांना खात्री होती. मात्र दोघांचे लग्न होऊ शकले नाही. एका मुलाखतीत तिने असा खुलासा केला की, तिला अभिनेता अर्जुन रामपालच्या पत्नीने मॉडेल बनण्याचा सल्ला दिला होता. तिच्याच सल्ल्याने बिपाशाने मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला.

सुपर मॉडेल असलेल्या बिपाशा बसूने 2001 मध्ये अजनबी या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. बिपाशाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये नो एंट्री, धूम 2, राज आणि अपहरन यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. एक काळ असा होता की बिपाशा बसू नेहमी तिच्यासोबत हातोडा घेऊन जायची. एकदा बिपाशा एका मोठ्या अपघातातून बचावली होती. या गोष्टीचा खुलासा तिने स्वतः केला आहे.

बिपाशाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, एकदा ती पीजी हॉस्टेलमध्ये येत असताना काही गुंड तिच्या कारच्या मागे लागले. यानंतर तिच्या गाडीत उपस्थित असलेल्या चालकाने मोठ्या हुशारीने त्या गुंडांना चकवा दिला होता. यानंतर ड्रायव्हरने तिच्या पीजी मालकाला फोन करून सर्व प्रकार सांगितला आणि सुरक्षिततेने बिपाशाला पीजीपर्यंत सोडले. हा किस्सा घडल्यानंतर कित्येक दिवस ती टेंन्शनमध्ये असल्याचेही बिपाशानेही सांगितले.

दरम्यान, अभिनेत्री बिपाशा बासूने अलिकडेच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. लग्नाच्या पाच वर्षानंतर अभिनेत्रीने ही गूड न्यूज दिल्याने तिच्या चाहत्यांमध्येही सोशल मीडियावरुन तिचे अभिनंदन केले होते.

हेही वाचा –अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीवर मोठं संकट, ‘एवढ्या’ लाखांच्या कर्जाखाली दबलंय दीपेश भानचं कुटुंब
सारा अली खानला वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये मिळाले मोठे सरप्राईज, चाहत्याने थेट रस्त्यावरच…
करण जोहरवर लागला सारा आणि कार्तिकचे नाते सर्वांसमोर आणल्याचा आरोप, शोच्या दिग्दर्शकाने दिले स्पष्टीकरण

Latest Post