Monday, July 1, 2024

बिपाशा बसूने लेक देवीचा ‘ताे’ व्हिडिओ शेअर केल्याने झाली ट्राेल; युजर्स म्हणाले, ‘भारतीय पालक त्यांच्या…’

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू गेल्या वर्षी एका सुंदर मुलीची आई झाली, जी 12 मे रोजी सहा महिन्यांची होईल. बिपाशाने याआधीही तिच्या मुलीचा चेहरा तिच्या चाहत्यांना दाखवला आहे. अशातच अलीकडे, तिने देवीचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या मुलीच्या भविष्याची भविष्यवाणी केली आहे. मात्र, यासाठी तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.

बिपाशा बसू (bipasha basu) हिने 12 नोव्हेंबरला देवीला जन्म दिला. यानंतर तिने आपल्या मुलीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले. बिपाशाप्रमाणेच करण सिंग ग्रोव्हरही देवीवर प्रेमाचा वर्षाव करायला विसरत नाही. अशात अभिनेत्रीने लाडक्या लेकीचा शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती बॉलशी खेळताना दिसत आहे. देवी ज्या पद्धतीने बॉलला किक मारत आहे ते पाहून बिपाशाने तिला ‘अॅथलीट’ म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशाने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून, कॅप्शमध्ये लिहिले, ‘नैसर्गिक खेळाडू.’ मात्र, अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच तिला कौतुकासोबतच टीकेचाही सामना करावा लागला.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘ती आता अॅथलीट कशी होईल? ती फक्त एक मूल आहे. भारतीय पालक त्यांच्या मुलांवर त्यांच्या आवडी-निवडी लादणे कधी थांबवतील हे मला समजत नाही. तुम्ही जर व्यायाम करत असाल किंवा फिटनेसकडे पूर्ण लक्ष दित असाल, तर याचा अर्थ असा नाही की, तुमच्या मुलीलाही तेच करायचे आहे.’ यासाेबत दुसरीकडे, अभिनेत्रीच्या बाळाचे काैतुक करताना एका चाहत्याने देवीचे वर्णन भावी ऑलिम्पिक मुलगी म्हणून केले आहे, त्याचबरोबर अनेकांनी देवीला सुंदर मूल म्हणत बिपाशा-करणचे अभिनंदन केले आहे.(bollywood actress bipasha basu shares morning exercise video of daughter devi calls her natural athlete)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या अक्षय अन् रवीनाचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

सरी या मराठी चित्रपटात वाजतंय ब्लॉकबस्टर ‘कांतरा’च्या संगीतकाराचे संगीत

हे देखील वाचा