Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड धक्कादायक! बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणी अटक, अरबस्तानातील तुरुंगात केले बंद

धक्कादायक! बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणी अटक, अरबस्तानातील तुरुंगात केले बंद

बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री क्रिसन परेरा हिला यूएईमधील शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. एका अहवालानुसार, क्रिसनला ड्रग्जसह पकडण्यात आले होते, त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी अभिनेत्रीचे कुटुंबीय तिच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, क्रिसनच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, “या प्रकरणात अभिनेत्रीला गाेवण्यात आले आहे.” क्रिसनचा भाऊ केविन म्हणतो, “गेल्या 2 आठवड्यापासून आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माझी बहीण निर्दोष आहे आणि तिला ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवण्यात आले आहे.” कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ‘क्रिसन जेव्हापासून विमानतळावर उतरली तेव्हापासून ते तिच्याशी बोलू शकले नाहीत.’ क्रिसनच्या भावाने सांगितले की, “इंडियन कॉन्स्यूलेटने आम्हाला 72 तासांनंतर कळवले की, तिला अटक करून शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.”

रिपोर्टनुसार, कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, “रवी नावाच्या व्यक्तीने क्रिसनला फसवले आहे.” कुटुंबाचा आरोप आहे की, रवी या व्यक्तीने यापूर्वी क्रिसनची आई प्रेमिला परेरा यांना तिच्या मुलीची “त्यांच्या टॅलेंट टीमशी” ओळख करून देण्यासाठी मेसेज पाठवला होता आणि अपकमिंग इंटरनेशनल वेब सीरीजसाठी क्रिसन भेटण्यासाठी उपलब्ध आहे का, असे विचारले होते. मीटिंग्सच्या एका सीरीजनंतर, दुबईमध्ये क्रिसनसाठी ऑडिशन लाॅक करण्यात आली आणि त्या माणसाने सर्व अरेंजमेंट्स सांभाळली.”

क्रिसनची आई प्रेमिला यांच्या म्हणण्यानुसार, “1 एप्रिल रोजी, क्रिसन फ्लाइटमध्ये जाण्यापूर्वी, आरोपीने तिला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते.” क्रिसनच्या कुटुंबाने असा दावा केला की, “त्यांनी तिला एक ट्रॉफी दिली, शक्यतो ती ट्रॉफी ऑडिशनच्या स्क्रिप्टचा भाग होती आणि ऑडिशनसाठी आवश्यक हाेती. म्हणून ती ट्रॅफी आपल्यासाेबत घेऊन गेली, ज्यानंतर शारजाह विमानतळावर आल्यावर क्रिसनला ताब्यात घेण्यात आले. ते पुढे म्हणाले की, “10 एप्रिल रोजी आम्हाला इंडियन कॉन्स्यूलेटने कळवले की, क्रिसनच्या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज सापडल्याचा आरोप आहे.”

क्रिसनचा भाऊ केविन म्हणाला, “आम्ही दुबईत आधीच एका स्थानिक वकिलाची नियुक्ती केली आहे, ज्याची फी 13 लाख रुपये आहे. आम्हाला अद्याप अधिकृत शुल्क आणि दंड माहित नाही, माझे कुटुंब आमचे घर गहाण ठेवण्याच्या तयारीत आहे. कारण, आम्ही वाचले आहे की, दंड 20-40 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकतो. 13 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत आणि आम्ही तिच्याबद्दल खूप काळजीत आहोत. देशद्रोही मोकळे फिरत असताना आम्हाला झोप येत नाही, जेवण जात नाही.”

अहवालानुसार, कुटुंबाने मुंबई पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना मदत करण्यासाठी काहीही केले गेले नाही. मंडळी आम्ही तुम्हाला सांगताे, क्रिसनने बाटला हाऊस (2019), सडक 2 (2020) आणि थिंकिस्तान (2019) सारख्या दमदार चित्रपटांत काम केले आहे.(bollywood actress chrisann pereira locked in uae sharjah central jail on charges of drug trafficking)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”

हे देखील वाचा