Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड एकदम कडक! मित्राच्या लग्नात थिरकली दिशा पटानी; पाहा भन्नाट व्हिडिओ

एकदम कडक! मित्राच्या लग्नात थिरकली दिशा पटानी; पाहा भन्नाट व्हिडिओ

बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्री सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. आपल्या हटके अदांनी भरलेले फोटो, व्हिडिओ ते चाहत्यांसाठी शेअर करत असतात. याबाबतीत प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीही मागे नाही. ती आपल्या चाहत्यांची मने जिंकण्यात नेहमीच आघाडीवर असते. ती आपले हॉट, बोल्ड आणि ग्लॅमरस असे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच ती आपल्या मित्राच्या लग्नात सहभागी झाली होती. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले असून ते जबरदस्त व्हायरल होत आहेत.

दिशा पटानीने आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती आपल्या नवरदेव मित्राच्या वरातीत एन्जॉय करताना आणि डान्स करताना दिसत आहे. यासोबतच एका इंस्टाग्रामवरील युजरनेही दिशाचा व्हिडिओ आपल्या अकाउंटवर पोस्ट केला आहे.

हे देखील वाचा