Saturday, June 29, 2024

दिशा पटानीची साेशल मीडियावर हवा, बाथरूम सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ

बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटानी साेशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे सिझलिंग आणि रिव्हिलिंग फोटो-व्हिडिओद्वारे तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधते. चाहतेही तिच्या फाेटाेवर भरभरुन प्रतिसाद देतात. अशातच आता अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट बिकिनी लूक शेअर केला आहे, ज्याने साेशल मिडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

तर झाले असे की, अभिनेत्री दिशा पटानी (disha patani) हिने बाथरूममधून तिचा मिरर सेल्फी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये दिशाने काळ्या रंगाचा बिकिनी आणि पांढरा बाथरोब घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. हा फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिशाने एक अप्रतिम कॅप्शनही लिहिले आहे.

दिशाने नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Eat your carbs’, दिशाच्या या फोटोला 10 लाखांहून अधिक लोकांनी प्रतिसाद दिला आहे आणि तिचा बिकिनी लूक लाइक केला आहे. इतकेच नाहीतर तिचा एक्स बाॅयफ्रेंड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने देखील दिशाच्या पोस्टवर कमेंट केली आहे आणि तिचा लूक शानदार असल्याचे सांगितले आहे. दिशाच्या पोस्टवर कमेंट करताना कृष्णा उर्फ ​​किशूने तिला ‘मॅम’ म्हटले आहे.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, दिशा अलीकडेच मोहित सूरीच्या क्राईम-थ्रिलर ‘एक व्हिलन 2’ मध्ये जॉन अब्राहमच्या विरूद्ध दिसली होती. या चित्रपटात तारा सुतारिया आणि अर्जुन कपूरचा दमदार अभिनयही पाहायला मिळाला. ‘एक व्हिलन 2’ नंतर आता दिशा ‘सूर्या 42’मध्ये दिसणार आहे. याव्यतिरिक्त दिशा सिद्धार्थ मल्होत्रासच्या ‘योद्धा’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण महत्वाच्या भूमिकेत आहेत. (bollywood actress disha patani share her new photo from bathroom goes viral)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भोपाळ वनविभागात दगडफेक केल्यामुळे भडकली रवीना टंडन, व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप

‘कितने आदमी थे’ म्हणणाऱ्या अमजद यांचा ‘अशा’प्रकारे झाला मृत्यू; अखेरच्या वेळेस बिग बींनी दिली होती साथ

हे देखील वाचा