Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड ‘कितने आदमी थे’ म्हणणाऱ्या अमजद यांचा ‘अशा’प्रकारे झाला मृत्यू; अखेरच्या वेळेस बिग बींनी दिली होती साथ

‘कितने आदमी थे’ म्हणणाऱ्या अमजद यांचा ‘अशा’प्रकारे झाला मृत्यू; अखेरच्या वेळेस बिग बींनी दिली होती साथ

बॉलिवूडमध्ये अनेक खलनायक होऊन गेले. अनेकांनी आपल्या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली पण गब्बर सिंगची भूमिका साकारणारे अमजद खान यांच्यासारखा खलनायक अद्याप झालाच नाही. ‘कितने आदमी थे?’ पासून या चित्रपटातील त्यांनी बोललेला प्रत्त्येक डायलॉग हिट झाला होता. त्यांच्या अभिनयाने त्यांनी कमी वयातच यशाचं शिखर गाठलं होतं. त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेमधून त्यांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. अशा दमदार खलनायकाची कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही. अमजद खान यांना चित्रपटामध्ये काम करण्याची खूप आवड तर होती, पण काळाने आघात केल्याने त्यांना खूप कमी कालावधीतच चित्रपटातून काढता पाय घ्यावा लागला.

त्यांच्या आयुष्यात एक अतिशय वाईट घटना घडली. या घटनेने त्यांचे रुपेरी पडद्यावरील आणि खासगी आयुष्य देखील पूर्णपणे विखुरले. याचा फटका त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना देखील बसला. यावेळी त्यांच्या वाईट प्रसंगामध्ये दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी त्यांना साथ दिली, त्यांच्या पाठीशी उभे राहिले. साल १९७९ मध्ये आलेला चित्रपट ‘द ग्रेट गैंबलर’मध्ये बिग बी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटामध्ये अमजद खान देखील झळकणार होते, परंतु नियतीच्या मनात त्यांनी या चित्रपटामध्ये काम करावे असे नव्हते. (Villain Amjad Khan had an accident on his way to Goa big b signed the papers in hospital for operation)

गोव्याला जाताना झाली दुर्घटना
‘द ग्रेट गैंबलर’ चित्रपटाची शूटिंग सुरू होती. चित्रपटाच्या शूटिंगचे बरेचसे काम गोव्यामध्येच होत होते. एक दिवस अमजद खान शूटिंगला जात असताना त्यांचे विमान रद्द झाले. त्यामुळे त्यांनी कारने मुंबईहुन गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार देखील होता. रस्ता मोठा असल्याने त्यांनी वाहनचालकाला थोडा आराम मिळावा म्हणून स्वतः कार चालवायला घेतली. त्यावेळी अचानक रस्त्यामध्ये मोठ्या ट्रकसमोर त्यांची गाडी आली आणि दोघांची टक्कर झाली. यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब जखमी झाले. साल १९७६ मध्ये घडलेल्या या घटनेमध्ये खलनायक देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातील हाडांचा चुरा झाला आणि ते कोमात गेले.

अमिताभ यांनी घेतली मोठी जवाबदारी
या दुर्घटनेनंतर अमिताभ बच्चन यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी अमिताभ यांनी त्यांच्या कुटुंबियांना उपचार देऊन सुखरूप घरी पाठवले. परंतु अमजद यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्यावेळी डॉक्टरांना एका हमीपत्रावर कोणाची तरी सही हवी होती. कोणीही याची हमी घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी बिग बी पुढे आले. त्यांनी अमजद यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आणि सही केली.

या घटनेमुळे अमजद यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्यांना पहिल्यापासून खाण्याची आवड होती. परंतु या घटनेनंतर ते बराच काळ व्हिलचेअरवर असल्याने त्यांचे खूप जास्त वजन वाढले होते. ते त्यांच्या पत्नीला नेहमी सांगायचे की मी झटकन देवा घरी जाईल. कुणाला जास्त त्रास देणार नाही. ते रुपेरी पडद्यावर जरी खलनायक असले, तरी त्यांच्या मुलांसाठी ते मोठे हिरो होते.

नेहमीप्रमाणे एक दिवस ते सायंकाळी कोणालातरी भेटायला तयार होण्यासाठी स्वतःच्या रूममध्ये गेले. तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राण ज्योत मालवली. खूप कमी वयात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचे निधन वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी २७ जुलै १९९२ मध्ये झाले. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी शैला खान आणि तीन मुलं आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी आहे खूपच रंजक, ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’

कॉमेडियान कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली खळबळ, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा