बिग बॉस ओटीटी विजेता दिव्या अग्रवाल तिच्या बाेल्ड फाेटाेमुळे कायमच चर्चेत असते. अशात नुकतेच दिव्याने बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना एका व्हिडिओद्वारे मॅसेज पाठवला आहे. व्हिडिओ मॅसेजमध्ये अभिनेत्रीने सर्वांसमाेर अनुराग कश्यप यांना काम मागितले आहे. या व्हिडिओसाठी काही टीव्ही स्टार्सने दिव्या अग्रवालला सपोर्ट करत आहेत, तर काही स्टार्स तिला प्रचंड ट्रोल करतानाही दिसत आहेत.
नुकताच दिव्या हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती असे म्हणताना दिसत आहे की, “गेल्या 15 वर्षांपासून मी इंडस्ट्रीशी जोडलेली आहे आणि मी खूप काम केले आहे. पण, मला अजूनही योग्य लोक मिळालेले नाहीत.” व्हिडिओमध्ये, तिने असेही म्हटले आहे की, ‘तिला कोणताही वेब शो किंवा चित्रपट नको आहे. तिला फक्त ऑडिशनसाठी योग्य दिशा हवी आहे, जी तिला आधी मिळाली नव्हती.’
दिव्या पुढे म्हणते की, “मी 15 वर्षांपासून काम करत असली तरी योग्य लोक माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. रिअॅलिटी शो, सीरिज आणि बरेच काही माझ्याप्रर्यंत पाेहचले. पण, मला आता ते काम करायचे आहे, ज्यात माझे मन लागेल. मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये पाहिले हाेते, तेव्हापासून मला तुझ्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. माझ्या सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा घेऊन मला हा मॅसेज तुम्हाला द्यायचा आहे. मला अजूनही खूप काम मिळतंय, पण तुम्ही जसे काम करता तसे काम मला करायचे आहे.”
View this post on Instagram
दिव्या अग्रवालचा हा व्हिडिओ साेशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक अभिनेत्रीवर टिका करत आहेत, तर काही लाेक अभिनेत्रीच्या धाडसाचे काैतुक करत आहेत.(bollywood actress divya aggarwal asks for work on instagram records video message for anurag kashyap says koi sharam nahi)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जोधा अकबर’ फेम अमन धालीवालवर जिममध्ये हल्ला, चोरट्यांनी अभिनेत्याला केले चाकूने जखमी
एका डोळ्याने दिसत नसूनही साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये देखील केला ‘या’ अभिनेत्याने आपल्या अभिनयाने धमाका