Tuesday, September 22, 2026
Home टेलिव्हिजन वरुण सूदसोबतच्या ब्रेकअपनंतर ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात पडलीय दिव्या अग्रवाल, सोशल मीडियावरुन केला कौतुकाचा वर्षाव

वरुण सूदसोबतच्या ब्रेकअपनंतर ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात पडलीय दिव्या अग्रवाल, सोशल मीडियावरुन केला कौतुकाचा वर्षाव

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत कार्तिकची भूमिका साकारून मोहसिन खानने (MOhasin Khan) घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. या भूमिकेने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. या शोद्वारे त्याने टीव्हीवर आपली पकड छाप पाडली. मोहसिन खानला आजही लोक त्याला त्याच्या ऑन-स्क्रीन पात्र ‘कार्तिक’ या नावाने हाक मारतात. मोहसिन खान आणि शिवांगी जोशी यांची कार्तिक-नायराची जोडी लोकांना आवडली. या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. पण अलीकडेच, टीव्हीची हसीना आणि बिग बॉस ओटीटी जिंकून टीव्ही जगतात मोठं नाव बनलेल्या दिव्या अग्रवालने (Divya Agrawal) मोहसीन खानवर अशी स्तुतीसुमने उधळली आहेत, जी ऐकून शिवांगी जोशीलाही थोडं वाईट वाटेल. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

दिव्या अग्रवाल ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने अभिनय जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु सध्या ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. दिव्या अग्रवालने मोहसीन खानबद्दल अशी गोष्ट सांगितली की तुम्हीही थक्क व्हाल. दिव्या अग्रवालने तिच्या सोशल मीडियावर मोहसीन खानसोबत एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये तिने अभिनेत्याला ‘चॉकलेट बॉय’ म्हटले होते. वास्तविक दिव्या अग्रवाल मोहसिन खानसोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे, त्यामुळे तिने चाहत्यांशी बोलण्यासाठी मला काहीही विचाराचा टास्क सुरू केला होता. त्यानंतर एका चाहत्याने दिव्याला विचारले की, “मोहसिन खानसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता?”

चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिव्या अग्रवालने तिच्या सोशल मीडियावर मोहसीनसोबत सेटवर मजा करतानाचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघेही काळ्या कपड्यात दिसत आहेत. टीव्हीच्या हँडसम हंकसोबत काम करण्याचा तिचा अनुभव शेअर करताना दिव्या अग्रवालने लिहिले, “त्याच्यासोबत काम करताना खूप मजा आली. उबेर चॉकलेट बॉयसोबतचा माझा आगामी प्रोजेक्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी स्वतःला रोखू शकत नाही,”

लव्ह शो ‘स्प्लिस्टविला’ या रिअलिटी शोमध्ये प्रियांक शर्मासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आलेली दिव्या अग्रवाल अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तीन महिन्यांपूर्वी तिने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे तिचा प्रियकर वरुण सूदसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. या बातमीनंतर चाहत्यांची मनं पूर्णपणे तुटली. दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांनी ब्रेकअपनंतरही मैत्री कायम ठेवली होती.

हे देखील वाचा