Wednesday, July 3, 2024

जिनिलियाने रितेशला अनाेख्या पद्धतीने दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ

बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांची धमाल शैली त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. दोघेही बॉलिवूडचे असे जोडपे आहेत, जे नेहमी हसत-खेळत असतात. जिनिलिया आणि रितेशची काॅमेडी रील सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळते. अशात चित्रपटसृष्टीतील हे लाडके जोडपे आज म्हणजेच 3 फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाचा 11वा वाढदिवस साजरा करत आहे.

जेनेलिया डिसूझा (genelia dsouza) आणि रितेश देशमुख (riteish deshmukh) शुक्रवारी म्हणजेच 3 फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दोघांनी आपली लग्नचा वाढदिवस एकत्र साजरी करण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. जिनिलिया आणि रितेश यांनी इन्स्टाग्रामवर त्यांची एक नवीन रील शेअर केली आहे. रील इतका मजेशीर आहे की हसून हसून तुमचही पाेट दुखेल.

व्हिडिओमध्ये जिनिलिया आणि रितेश ग्रे रंगाच्या हुडीजमध्ये दिसत आहेत, ज्यावर लिहिले आहे, “जगाच्या शेवटपर्यंत एकत्र राहू.” रीलबद्दल बाेलायचे झाले तर, व्हिडीओमध्ये जिनिलिया तिच्या पतीला सांगत आहे की, “मी तुझ्यासाठी संपूर्ण दुनियाशी लढू शकते.” याला उत्तर देताना रितेश म्हणताे, ‘तू दिवसभर माझ्याशी भांडत राहतेस.’ यावर प्रती उत्तरास जिनिलिया म्हणते, “हो, तूच माझी दुनिया आहेस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रील व्यतिरिक्त, जिनिलियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो देखील शेअर केला आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने रितेशला  लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फाेटाेत, जिनिलिया आणि रितेश ट्विनिंग हुडीजमध्ये एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. जिनिलियाने पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “हॅप्पी एनिवर्सरी पार्टनर.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटात रितेश आणि जिनिलिया एकत्र दिसले होते. या चित्रपटाच्या माध्यमातून जवळपास 10 वर्षांनंतर या दाेघांची जाेडी रुपेरी पडद्यावर पाहायला एकत्र पाहायला मिळाली. जिनिलिया आणि रितेश शेवटचे ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात एकत्र दिसले होते.(bollywood actress genelia dsouza and riteish deshmukh celebrate 11th wedding anniversary in a quirky way )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अखेर गुरमीत आणि देबीना यांनी त्याच्या लहान मुलीचा दिविशाचा चेहरा आणला जगासमोर

जान्हवी तमिळ चित्रपटातून साऊथमध्ये ठेवणार पाऊल? वडील बोनी कपूर यांनी सांगितले व्हायरल बातमीचे सत्य

हे देखील वाचा