Tuesday, July 9, 2024

क्या बात! चक्क बुलेटवर बसून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली होती ‘लग्नाची बिदाई’

बॉलिवूडमधील अभिनेत्री गुल पनाग हीचा आज वाढदिवस. ३ जानेवारी १९७९ ला चंदिगढमध्ये गुलचा जन्म झाला. गुलने १९९९ साली मिस इंडिया हा ‘किताब आपल्या नावावर करत तिने ब्यूटीफल स्माईल हा पुरस्कार देखील जिंकला. त्यानंतर २००३ साली तिने ‘धूप’ या सिनेमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र गुल या इंडस्ट्रीमध्ये तिचे पाय रोवू शकली नाही. तिने खूप मोजक्याच चित्रपटात काम केले. मात्र गुल तिच्या गोड हसण्यामुळे आणि खळी मुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच लोकप्रिय झाली.

गुलने तिच्या छोट्याश्या करिअर मध्ये, ‘डोर’, ‘मनोरमा सिक्स फीट अंडर’, ‘हेलो’, ‘स्ट्रेट’ आणि ‘अब तक छप्पन 2’ अशा हिंदी सिनेमात काम केले. गुल ही अभिनेत्रीसोबतच पायलेट, फार्मूला कार रेसर, वीओ आर्टिस्ट आणि राजनेता आहे. ती तिच्या खऱ्या आयुष्यात अतिशय कुल आणि बिनधास्त आहे.

गुलने १३ मार्च २०११ ला तिच्या मित्राशी ऋषी अत्रीशी लग्न केले. तेव्हा गुलचे लग्न चर्चेचा विषय बनले होते. कारण गुलने तिची पाठवणी (बिदाई) एका बाईकवरून केली होती. जय वीरू सारख्या बाईकवरून गुल ऋषी सोबत गेली. तिचा हा कुल अंदाज लोकांना खूप आवडला होता. तिच्या या अंदाजमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत अधिक वाढ झाली.

वयाच्या ३९ व्या वर्षी गुलने एका मुलाला जन्म दिला, पण अनेक दिवस तिने तिच्या मुलाला सर्वांपासून लपून ठेवले.
गुल तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे देखील खूप चर्चेत आली होती. २००८ साली गुलने मॅक्सिम मासिकासाठी खूप बोल्ड फोटोशूट केले होते ज्यामुळे गुल प्रकाशझोतात आली. २०१४ साली गुलने राजकारणात येत करत आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिला २०१४ च्या लोकसभा निवणुकांसाठी चंदिगढ मधून तिकीट देखील मिळाले. गुलच्या विरोधात या ठिकाणी बीजेपीच्या किरण खेर आणि काँग्रेसचे पवन बंसल उभे होते. गुलचा या निवडणुकीत पराभव झाला.

गुल तिच्या फिटनेस बाबतही खूप जागरूक असते. काही दिवसांपूर्वी गुलचा साडीमध्ये पुशअप करतांनाचा एक व्हिडिओ खूप वायरल झाला होता.

हे देखील वाचा