बॉलिवूड इंडस्ट्रीतील लव्ह बर्ड्स म्हणजेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी त्यांच्या लग्नाला 43 वर्षे पूर्ण केली आहेत. या खास दिवशी, या जोडप्याला चाहत्यांसह स्टार्सकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. त्याचवेळी, आता हेमा मालिनी यांनी आपल्या हितचिंतकांसाठी पोस्ट टाकून आभार व्यक्त केले आहेत. तसेच गेल्या काही वर्षांचे अनेक फोटो शेअर करून त्यांनी चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट दिली आहे.
हेमा मालिनी (hema malini) यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पती धर्मेंद्रसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या पाेस्टमध्ये विवाहित जाेडप्यांचे काही न पाहिलेले फाेटाे पाहायला मिळत आहेत. त्याचवेळी हेमाने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त, ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी वैयक्तिक आभार मानते. 43 वर्ष एकत्र राहण्याचा हा एक अद्भुत प्रवास आहे आणि तुमच्या सर्व शुभेच्छांसह, हा प्रवास सुरळीत सुरु राहील.”
These photos taken today on our 43rd anniversary❤️???? pic.twitter.com/O1T0MIlcxd
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2023
हेमा मालिनी यांनीही चार फोटोंच्या सीरीजमध्ये एक खूप जुना फोटो शेअर केला आहे, जो 1980चा आहे. त्याच वेळी, त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आणखी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्या त्यांच्या पतीसोबत 43व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. या ट्विटमध्ये अभिनेत्रीने पुढे म्हटलं आहे की, ‘हे फोटो आज आमच्या 43व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आले आहेत.’ फोटोमध्ये कपल एकमेकांचा हात धरून हसताना दिसत आहे.
I personally thank all those who have wished us on our wedding anniversary today????
It has been a wonderful journey spanning 43years of togetherness and with all your good wishes, will continue to be a smooth journey in tandem????Few photos over the years pic.twitter.com/5x2PadxyyX— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2023
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे प्रेम आणि एकता पाहून चाहतेही आनंदी आहेत, तसेच या जोडप्याचे खूप कौतुक करत आहेत. एका ट्विटर युजरने कमेंट करत लिहिले की, ‘हेमा जी तुम्हा दोघांनाही चांगले आरोग्य आणि शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’, तर दुसर्याने लिहिले, ‘एक अद्भुत प्रेमकथा, देव तुम्हा दोघांचे कल्याण करो आणि तुमचे आयुष्य आनंदाने भरो.'(bollywood actress hema malini shared 43rd wedding anniversary pictures with dharmendra thanks everyone for wishes)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ओ…हो…! करण जोहर त्याच्या आगामी सिनेमात शाहरुख खान नाही तर ‘या’ सुपरस्टार अभिनेत्यासोबत करणार काम?
मेट गालाच्या रेड कार्पेटवर आलियाने घातला एक लाख मोत्यांचा ड्रेस, जाणून घ्या ड्रेसेची विशेषता