Monday, April 15, 2024

…म्हणून मिथून चक्रवर्तींशी भांडल्या होत्या हेमा मालिनी, ‘इंटिमेट’ सीनबद्दलही बोलल्या ‘असे’ काही

आज आम्ही तुम्हाला हेमा मालिनी आणि मिथुन दा या दोन्ही स्टार्सचा एक किस्सा सांगणार आहोत. जेव्हा हेमा मालिनी या चित्रपटातील सीनबाबत मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत भांडल्या होत्या.

खरं तर, हा किस्सा 1988 सालचा आहे, जेव्हा हेमा मालिनी आणि मिथुन चक्रवर्ती 1989 मध्ये रिलीझ झालेल्या ‘गलियों का बादशाह’ या चित्रपटात एकत्र काम करत होते. त्या काळात मिथुन चक्रवर्ती हे इंडस्ट्रीत खूप मोठे स्टार होते, तर हेमाचे स्टारडमही काही कमी नव्हते. तरीही मिथुनसमोर अभिनेत्रीची प्रसिद्धी थोडी कमीच होती. (when hema malini clashed with mithun chakraborty on the sets of the film)

या चित्रपटात मिथुन आणि हेमा मालिनी यांच्यातील इंटिमेट सीन्सही चित्रित करण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, मिथुनने चित्रपटातील सीनबाबत दिग्दर्शकाला सांगितले होते की, हेमा मालिनीपेक्षा त्यांचे सीन चित्रपटात जास्त ठेवले जावेत आणि हेमा मालिनीचे काही सीन काढून टाकावेत.

जेव्हा हेमा मालिनी यांना समजले की, त्यांचे सीन हटवण्यास सांगितले आहे, तेव्हा त्या खूप संतापल्या. एवढेच नाही, तर हेमा मालिनी हे ऐकून दिग्दर्शक आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे ओरडत पोहोचल्या. हेमा दोघांना सांगू लागल्या की, जेव्हा चित्रपटात इंटिमेट सीन्स ठेवायचे नाहीत, तर ते का चित्रित करायचे? त्यावर मिथुन आणि दिग्दर्शकाने त्यांना समजावून सांगितले की, केवळ आवश्यक नसलेले सीन्स काढून टाकण्यात आले आहेत.

हेमा मालिनी यांनी उत्तर दिले आणि म्हणाल्या की, “मला तुमच्या दोघांमधील सर्व संभाषण माहित आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, “मला हे देखील माहित आहे की, माझे स्वतःचे सीन का हटवले गेले आहेत.” यानंतरही हेमाला पटले नाही, त्यांनी याबाबत अभिनेते राजकुमार यांच्याकडे तक्रारही केली. या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर राजकुमारनेही दिग्दर्शकाला खडसावले होते. मात्र, बदलत्या काळानुसार हेमा मालिनी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात हळूहळू सर्वकाही सुरळीत होत गेले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो

दलाई लामा आणि बाइडन यांच्या मैत्रीवर केलेली ‘ती’ पोस्ट क्वीनच्या अंगाशी, ऑफिसच्या बाहेर निर्दशने पाहून कंगनाने मागितली माफी

 

हे देखील वाचा