बाॅलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला अनुराग कश्यपने 2012 मध्ये पहिला ब्रेक दिला होता. हुमा आणि अनुराग दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटी मानले जातात. हुमा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चित्रपटसृष्टीपासून ते सामाजिक विषयांवर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करत असते. अशातच एका गाण्यावरून सोशल मीडियावर हुमा आणि अनुरागमध्ये भांडणं झाले आहे. या वादात अनुरागसोबत अमित त्रिवेदीही अडकला आहे.
हुमा कुरेशी (huma qureshi) हिने अनुरागच्या आगामी चित्रपट ‘ऑलमाेस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ ची व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “मी अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यपवर माझी गाणी चोरल्याबद्दल तक्रार करत आहे.” हुमाची ही मजेशीर पोस्ट शेअर करत अनुरागने चाेख उत्तर दिले आहे.
अनुराग कश्यपने लिहिले ‘हाहाहाहाहा आणि तो कधीच रिलीज झाला नाही’. दिग्दर्शकाने उत्तरासोबत हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
हुमा कुरेशी अनुराग कश्यपच्या लोकप्रिय क्राईम ड्रामा ‘गँग्स ऑफ वासेपूर’चा एक भाग होती, जो 2012 मध्ये दोन भागात प्रदर्शित झाला होता. अनुरागसोबतच्या पहिल्या भेटीचा संदर्भ देत हुमाने एका मुलाखतीत सांगितले की, “मी अन् आमिर सॅमसंग अॅड चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना अनुरागने त्याच्या चित्रपटात काम करण्याचे वचन दिले होते. मी इतकी मूर्ख होतो की मी त्याला सांगितले की, “मी नुकतीच मुंबईला आली आहे आणि चित्रपट मिळण्यासाठी खूप संघर्ष करत आहे. मी ‘गँग्स ऑफ वासेपूर’साठी ऑडिशनही दिले नव्हते.”
करण मेहता आणि अलाया एफ ‘ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’मध्ये आहेत. या चित्रपटाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अनुरागने सांगितले की, “हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. माझ्या मुलीशी वर्षानुवर्षे बोलल्यानंतर मी त्यावर काम केले आहे. तरुण कलाकार आणि अमित त्रिवेदीच्या संगीतामुळे ते तल्लख बनले आहे. रिलेशनशिपमुळे चालत असलेल्या एक्सप्लोरेशनचा एक वेगळा भाग आहे. हा चित्रपट प्रेम आणि त्याच्याशी संबंधित सर्व पूर्वग्रहांवर आधारित आहे, मला या चित्रपटाद्वारे माझ्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर जाताना खूप छान वाटत आहे.” असे मत अनुरागने मांडले.
अशात हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.(bollywood actress huma qureshi allegation on anurag kashyap for stealing her song she will sue director reacted)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ही दोस्ती तुटायची नाय! छोटा भाईजान घराबाहेर पडताच ढसा ढसा रडला शिव ठाकरे
ऑटोग्राफ देऊन पस्तावला सलमान, ती म्हणते तुझी सही माझ्याकडे, पोराच्या नावावर करणार फार्महाऊस