Thursday, March 28, 2024

हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल

बॉलिवूडमध्ये आपला दमदार अभिनय आणि वेगळ्या भूमिकांमधून ओळखली जाणारी अभिनेत्री कल्की कोचलिन (kalki koechlin) हिचा जन्म 10 जानेवारी 1984रोजी पॉंडीचेरी येथे झाला होता. यंदा कल्की तिचा 38 वा वाढदिवस साजरा करतेय. कल्कीचे वडील फ्रेंच आणि आई भारतीय आहेत. तिचे आजोबा मॉरिस कोचलिन आयफेल टॉवर आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे मुख्य अभियंता होते. तर कल्कीचे वडील जोल कोचलिन विमान बनविणारा कारखाना चालवतात.

घरात करियरसाठी इतका वेगवेगळा वारसा लाभलेला असताना कल्कीने मात्र स्वत: साठी बॉलिवूडचा मार्ग निवडला. आज याच फ्रेंच आणि भारतीय सभ्यतेचं मिश्रण असणाऱ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. कल्कीला शुभेच्छा देण्यापूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर एक छोटीशी नजर मारुयात. (kalki koechlin birthday special know about her personal life and lesser known facts)

कल्कीने लंडन विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केलं. तिला फ्रेंच व्यतिरिक्त हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषांचंही ज्ञान आहे. 2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाद्वारे कल्कीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

कल्कीची चित्रपट कारकीर्द प्रचंड चढउतारांनी भरली आहे. तिने सुरुवातीला चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून चांगली सुरुवात केली होती, परंतु पुढे जाऊन ती केवळ एक सहाय्यक अभिनेत्रीच ठरली. तिला ‘देव डी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

कल्कीच्या चित्रपट करकीर्दीसोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यही खूप अस्थिर राहिलं आहे. कल्कीने 30 एप्रिल 2011 रोजी ‘देव डी’ चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. परंतु हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत. दोघेही दोन वर्षात विभक्त झाले. अनुरागचं हे दुसरं तर कल्कीचं पहिलंच लग्न होतं.

विभक्त झाल्यानंतर, 13नोव्हेंबर 2013 रोजी दोघांनी “आम्ही एकमेकांना सोडत आहोत, जेणेकरून परिस्थिती आणि त्यामागील कारणे आम्हाला समजू शकतील,परंतु आम्ही घटस्फोट घेतलेला नाही,” असं विधान केलं होतं.

दोघांनीही माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली होती. परंतु, 2015 मध्ये अखेर या दोघांचा घटस्फोट झालाच. या दोघांच्या घटस्फोटाचं कारण कल्कीने दोघांमधील वयाचं अंतर सांगितलं. परंतु असं असलं तरी अनुराग आणि कल्की आजही चांगले मित्र आहेत. आजही कल्की अनुरागच्या प्रोजेक्ट्समध्ये आपल्याला काम करताना दिसते.

अनुराग कश्यपशी घटस्फोट घेतल्यानंतर कल्की तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. कल्की आजकाल गाय हर्शबर्गसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत आहे. 2020च्या फेब्रुवारीमध्ये तिने आपल्या पहिल्या मुलास जन्मही दिला आहे.

अद्यापही, कल्की आणि तिचा प्रियकर गाय हर्षबर्ग यांनी लग्न केलेलं नाही. याबद्दल बोलताना, कल्कीने तिच्या गर्भधारणेच्या घोषणेदरम्यान सांगितलं होतं की, “आम्ही आमच्या लग्नाला विरोध करत नाही परंतु मी फक्त गर्भवती असल्यामुळं आम्हाला लग्नदेखील करायचं नाही. आमच्या मुलाची कागदपत्रे आणि शाळा नोंदणीसाठी कधी गरज भासल्यास आम्ही त्यावर नक्की विचार करू.”

कल्कीने आतापर्यंत ‘देवडी’, ‘शैतान’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘माय फ्रेंड पिंटो’, ‘एक थी डायन’, ‘गली बॉय’, ‘सेक्रेड गेम्स 2’, ‘मार्गरिटा विथ अ स्ट्रॉ’ या अशा अनेक विविध कलाकृतींमध्ये काम केलं आहे. फ्रान्सचं नागरिकत्व असलेली कल्की तिचं सर्वाधिक आयुष्य भारतातच जगली आहे. यासोबतच कल्की फ्रेंच नाटकांची लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मातीदेखील आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी जाड होते म्हणून मलायकाला छैय्या छैय्या…’, तब्बल 25 वर्षांनंतर शिल्पाने तोडले मौन
शाळेत रात्री मोठ्या आवाजात गाणे वाजताच संतापले दिग्दर्शक; पोलिसांना टॅग करत म्हणाले, ‘कान फाटणाऱ्या…’

हे देखील वाचा