इलियाना डिक्रूझ ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आजही ‘बर्फी‘ चित्रपटाती तिच्या अभिनयाचे काैतुक केले जाते. तिने फार कमी हिंदी चित्रपट केले असले, तरी तिचे काम प्रशंसादायक आहे. इलियाना केवळ हिंदीच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतीलही एक प्रसिद्ध नाव आहे. तिचा शेवटचा चित्रपट ‘द बिग बुल’ होता, ज्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगला प्रतिसाद मिळाला. अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी अभिनेत्री चर्चेत येण्याचे कारण तिचा चित्रपट नसून तिची प्रकृती आहे.
इलियाना डिक्रूझ (ileana dcruz) हिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने दाखवले आहे की तिला फ्लूइड्स देण्यात आले आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्यावर आईवी फ्लूइडच्या तीन बॅग चढवण्यात आल्या. यासोबतच तिने आणखी एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने त्या सर्व लोकांचे आभार मानले आहेत, ज्यांनी तिच्या आरोग्याची माहिती घेण्यासाठी फोन केला होता आणि तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. इलियानाने सांगितले की, ‘सध्या ती पूर्णपणे बरी आहे.’
काही वर्षांपूर्वी इलियाना डिक्रूझने खुलासा केला होता की, तिला बॉडी डिस्मॉर्फिक ऑर्डरचा त्रास होत आहे. तिने 2017 मध्ये उघड केले की, ‘ती बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डरने ग्रस्त आहे.’ यादरम्यान, तिच्या मनात सतत आत्म’हत्येचे विचार येत होते. ही अशी समस्या आहे, ज्यामध्ये रुग्णाला त्याच्या शरीरात कमतरता जाणवते.
इलियाना डिक्रूजबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे की, ती कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेन मायकलला डेट करत आहे. दोघांचे काही फोटोही साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल झाले हाेते. मात्र, दोघांनीही या नात्याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.(bollywood actress ileana dcruz hospitalized actress treated with three bags of iv fluids)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सलमान खानमुळेच माझी आई…’ म्हणत राखी सावंतच्या भावाने मानले दबंग खानचे आभार
‘…कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला’, अभिनेत्री विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत