Wednesday, February 21, 2024

शरीराच्या ‘या’ आजारामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती इलियाना डिक्रूझ, आत्महत्येचाही करायची सतत विचार

टॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्येही आपली सुंदरता आणि अदांचा जलवा करणारी अभिनेत्री आहे इलियाना डिक्रूझ. तिचे वडील रोनाल्डो डिक्रूझ हे पोर्तुगीज कॅथलिक आहेत, तर आई मुस्लिम आहे. ती दहा वर्षांची असताना तिचे संपूर्ण कुटुंब गोव्यात स्थलांतरित झाले. 2014 मध्ये तिला पोर्तुगालचे नागरिकत्वही मिळाले. तिने एका मुलाखतीत म्हटले होते, तिचे पूर्वज पोर्तुगीज होते, मग ती वेगळी कशी असू शकते? शुक्रवारी ( 1 नोव्हेंबर) अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

इलियानाचा जन्म 1 नोव्हेंबर 1987 रोजी माहीम, मुंबई येथे झाला. तिच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर 2003 मध्ये तिने ग्लॅमरच्या जगात प्रवेश करण्यासाठी तिचे पहिले फोटोशूट केले होते. हे फोटोशूट खूप वाईट असल्याचे इलियाना नेहमी सांगत असते. यानंतर तिने पुन्हा पोर्टफोलिओ बनवला. त्यानंतर हळूहळू तिला जाहिराती मिळू लागल्या. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, करिअरच्या सुरुवातीला चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी तिला खूप सपोर्ट केला.

इलियाना डिक्रूझने २०१२ मध्ये रिलीझ झालेल्या ‘बर्फी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. मात्र इलियानाने अभिनयाच्या दुनियेत २००६ मध्येच पाऊल ठेवले होते. तिने पहिल्यांदा तेलुगू चित्रपट ‘देवादासू’मध्ये काम केले होते. २००६ मध्ये ‘आरती’ चित्रपटाद्वारे तिने तमिळमध्येही पदार्पण केले. हिंदी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी इलियानाने साऊथमध्ये १८ चित्रपट केले होते, ज्यामध्ये तिने सर्वाधिक तेलुगू चित्रपट केले आहेत.

‘बर्फी’ चित्रपटातूद्वारे तिने बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले. आत्तापर्यंत इलियानाने ‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘मैं तेरा हिरो’, ‘हॅपी एंडिंग’, ‘रुस्तम’, ‘रेड’, ‘बादशाहो’, ‘मुबारकां’, ‘द बिग बुल’ असे अनेक चित्रपट केले आहेत. ‘तेरा क्या होगा लवली’ हा तिचा आगामी चित्रपट असून, तो पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

एका मुलाखतीदरम्यान इलियानाने तिच्या फिटनेसबद्दल सांगितले होते की, ती स्वतःला अजिबात फिट मानत नव्हती. एक काळ असा होता, जेव्हा लोक तिच्या बॉडीबद्दल टिंगल करायचे. त्यामुळे इलियाना खूप नाराज व्हायची. तिने त्या मुलाखतीत असेही सांगितले होते की, या गोष्टींना कंटाळून तिला तिचे आयुष्य संपवायचे होते. परंतु घरच्यांचा पाठिंबा आणि प्रेमामुळे तिने आत्महत्येचे पाऊल न उचलण्याचा निर्णय घेतला. तिच्या या एका निर्णयामुळे ती आज लाखो हृदयांची आवडती बनली आहे.

पण आता इलियानाला तिचे शरीर खूप आवडते. ती नेहमी लोकांना सांगते की, तुम्ही कसेही दिसा, तुम्ही सर्वोत्तम आहात. जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल, तर इतरांकडून अपेक्षा करू नका. इलियानाने मुलाखतीत सांगितले होते की, तिला माहित नव्हते की ती डिप्रेशनमध्ये आहे. जेव्हा तिला हे लक्षात आले, तेव्हा तिला समजले की, ती ‘डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ची शिकार आहे, ज्यामध्ये केवळ कंबरेचा खालचा भाग वाढतो. इलियाना अनेक दिवसांपासून या आजाराशी झुंज देत आहे आणि त्याचवेळी ती सकारात्मक विचाराने पुढेही जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-
‘या सगळ्यांसमोर मी आपली इवलुशी, पण…’, ‘झिम्मा 2’फेम अभिनेत्रीच्या पोस्टने वेधल लक्ष
‘इरफानला 5 वर्षां केले डेट, गंभीर करायचा मिस कॉल …’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

हे देखील वाचा