Saturday, June 22, 2024

इशिता दत्ताच्या घरी येणार छोटा पाहुणा, अभिनेत्रीने शेअर केला लेटेस्ट व्हिडिओ, एकदा पाहाच

अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटात त्याच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ताच्या घरी छोट्या पाहुण्याचं लवकरच आगमन हाेणार आहे. खरे तर, इशिता दत्ताने नुकतेच तिचे नवीन घर घेतले आहे. अशात घराच्या गृहप्रवेश पूजेच्या निमित्ताने इशिताने तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

इशिता दत्ता (ishita dutta) हिने आधी तिच्या आई-वडिलांसोबत देवाची पूजा केली आणि नंतर तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंवर चाहत्यांनी इशिताला लवकरच आई होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. इशिता दत्ताने 28 नोव्हेंबर 2017 रोजी तिचा को-अभिनेता वत्सल सेठसोबत गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी इशिता आणि वत्सल बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते.

इशिता दत्ता चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी टीव्ही सीरियल्सची स्टार होती. अनेक टीव्ही मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्यानंतर इशिता दत्ताची मुलाखत वत्सल सेठसाेबत झाली. इशिता आणि वत्सल यांची भेट ‘रिश्तों का सौदागर-बाजीगर’ या टीव्ही मालिकेत झाली होती. या मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली, ज्यानंतर दोघेही काही दिवस मित्र राहिले आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या मालिकेच्या सेटवर दोघांनी खूप वेळ एकत्र घालवला. मैत्रीनंतर वत्सलने एक दिवस इशिताला प्रपोज केले. इशिताही हो म्हणाली आणि दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर इशिता दत्ता आणि वत्सल सेठ यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वत्सल्यने एका मुलाखतीत त्याच्या लग्नाच्या प्रपाेझरबाबत सांगितले हाेते की, “आमच्या लग्नाला मुंबई मेट्रो जबाबदार आहे. जेव्हा मी इशिताला लग्नासाठी प्रपोज केले, तेव्हा तिने विचारले की. ‘तुला माझ्याशी लग्न का करायचे आहे.’ त्यावर मी उत्तर दिले की, मुंबईत मेट्रोचे काम सुरू आहे. म्हणून प्रत्येक वेळी तुला पाहण्यासाठी मी इतकं माेठं ट्रेफिक पार करु शकत नाही आणि त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.” असे अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. (bollywood actress ishita dutta flaunt her baby bump in griha pravesh puja while worshiping god with her parents shared good news with fans )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे’, नसीरुद्दीन शाह यांचे मोदी सरकारवर सडेतोड आराेप

आमिरची लाडकी आयरा महागडी कार सोडून ऑटोमधून दिसली प्रवास करताना, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा