Tuesday, June 18, 2024

‘मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे’, नसीरुद्दीन शाह यांचे मोदी सरकारवर सडेतोड आराेप

नसीरुद्दीन शाह हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिली असून त्यांच्या चित्रपटांसाठी लाेक वेडे आहेत. नसीरुद्दीन यांना आव्हानात्मक भूमिका साकारायला प्रचंड आवडतात. अलीकडेच त्यांची ‘ताज: रेन ऑफ रिव्हेंज’ ही वेब सिरीज जी5 वर रिलीज झाली आहे, ज्यामधील त्यांचा अभिनय खूप पसंत केला जात आहे. अशात त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे, जी सरकार चतुराईने सिनेमाद्वारे पसरवत आहे.’

नसीरुद्दीन शाह (naseeruddin shah) यांनी सत्ताधारी भाजप सरकार यांच्यावर टीका करत म्हणटले की, “काही चित्रपट आणि शो निवडणुकीत मते मिळविण्यासाठी प्रचार म्हणून वापरले जात आहेत आणि हे अत्यंत चिंताजनक आहे. या सर्वांचा वापर सत्ताधाऱ्यांनी अतिशय चलाखीने केला आहे. सुशिक्षित लोकांमध्येही मुस्लिमांचा द्वेष करणे ही आजकाल फॅशन झाली आहे.”

नसीरुद्दीन पुढे म्हणाले की, “निवडणूक आयोगही अशा गोष्टींवर काहीही बोलत नाही. देशातील राजकीय पक्ष निवडणुकीसाठी धर्माचा खुलेआम वापर करत आहेत. या गोष्टींवर निवडणूक आयोग नेहमीच मौन बाळगतो. कोणत्याही मुस्लिम नेत्याने ‘अल्लाह हू अकबर’च्या नावाने मते मागितली असती, तर आतापर्यंत गदारोळ झाला असता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Contiloe Pictures (@contiloepictures)

नसीरुद्दीन यांनी कर्नाटक निवडणुकीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींवरही टीका केली आहे. ते म्हणाले की, “पीएम मोदी देखील या गोष्टींचा खूप वापर करतात, अलीकडेच त्यांनी या गोष्टींचा वापर केला आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत धर्माचा हा वापर लवकरच संपेल असे मला वाटते.” असे अभिनेत्यांनी सांगितले.

नवारुद्दीन यांच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘डर्टी पिक्चर’, ‘ओके जानू’, ‘जिंदगी ना मिलेगी दाेबारा’, ‘सात खून माफ’ या सारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (Bollywood actor naseeruddin shah says hate against muslims has become fashionable being cleverly tapped into by government )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
इश्क का रंग सफेद! उर्वशी राैतेलाचा ‘व्हाईट फेदर गाऊन’मध्ये ग्लॅमरस अंदाज, फाेटाे व्हायरल

विकी काैशल अन् सारा दिसले रोमँटिक अंदाजात, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा