कलाकारांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत स्वत:चे घर घेणे ही सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. मग ते घर मुंबईसारख्या शहरात घ्यायचे, हे तर अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीचे हेच स्वप्न आता पूर्ण झाले आहे. सन २००९ मध्ये ‘अलादिन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे माध्यमांमध्ये असते. आता ती आपल्या घरामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जॅकलिनने अभिनेत्री प्रियांका चोप्राचे जुने घर विकत घेतले आहे. यासाठी तिने भली मोठी रक्कम मोजली आहे. जॅकलिन फर्नांडिस प्रियांका चोप्राच्या जुन्या घरात शिफ्ट झाली आहे. या घराची किंमत जवळपास ७ कोटी रुपये आहे. हे घर मुंबईच्या जुहू भागात आहे. हे तेच घर आहे जिथे प्रियांका २०१८ साली निक जोनाससोबत लग्नाच्या बंधनात अडकली होती. हे घर कर्मयोग नावाच्या बिल्डिंगमध्ये आहे.
प्रियांका चोप्राने ज्याला घर विकले त्याच्याकडूनच घेतले विकत
माध्यमातील वृत्तानुसार, नुकतेच जॅकलिन या घरामध्ये शिफ्ट झाली आहे. या घरामध्ये मोठा लिव्हिंग एरिया आणि आऊटडोर बालकनी आहे. जॅकलिन मागील अनेक वर्षांपासून मुंबईच्या बांद्रा भागात भाड्याच्या घरात राहत होती. प्रियांकाची आई मधू चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ यारी रोडच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेले आहेत. त्यामुळे हे घर जॅकलिनला मिळाले आहे. प्रियांकाच्या जवळच्या व्यक्तींनुसार, हे घर आता प्रियांका चोप्राचे नाही. तिने हे घर विकले होते आणि आता जॅकलिनने हे घर घेतले आहे.
जॅकलिनचे आगामी प्रोजेक्ट्स
जॅकलिनच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती यावर्षी खूप व्यस्त आहे. तिने नुकतेच सैफ अली खानसोबत ‘भूत पोलीस’ची शूटिंग केली आहे. यानंतर आता ती लवकरच रोहित शेट्टीचा सिनेमा ‘सर्कस’ची शूटिंगही लवकरच सुरू करणार आहे. मागच्या वेळी ती ‘मिस सीरियल किलर’ सिनेमात दिसली होती. शिरीष कुंदर दिग्दर्शित हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर रिलीझ झाला होता.
हेही वाचा-
लंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसने शेअर केलं हॉट फोटोशूट! चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस!