Thursday, April 25, 2024

लंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिसने शेअर केलं हॉट फोटोशूट! चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस!

बॉलिवूडची हॉट आणि मादक अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस नेहमीच तिच्या फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकत आली आहे. जॅकलिनचे हॉट फोटो बर्‍याचदा इंस्टाग्रामवर व्हायरल होत असतात. सध्या अगदी हेच घडत आहे.… नुकतेच जॅकलिनने तिचे काही सुपर सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जॅकलिन निव्वळ अप्रतिम दिसत आहे. जॅकलिनने प्रत्येक फोटोमध्ये एक वेगळी पोज दिलेली पाहायला मिळत आहे.

जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसत असून त्याबरोबर तिने हलके सोनेरी बेली परिधान केले आहेत. वास्तविक, जॅकलीनने तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटोशूट शेअर केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही अभिनेत्रीच्या या फोटोंवर भाष्य केले असून तीचं कौतुक केलं आहे. शिल्पाने जॅकलिनच्या फोटोंचं वर्णन ‘आश्चर्यकारक’ असं केले आहे.

जॅकलिनने नुकतच ‘भूत पोलिस’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाशिवाय जॅकलिन बॅक-टू-बॅक बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘किक 2’ सोबतच ती अक्षय कुमारच्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘भूत पोलिस’ या चित्रपटाचं पोस्टरही प्रसिद्ध झालं आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात जॅकलीनसह सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पवन कृपलानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ‘किक 2’ मध्ये जॅकलिनबरोबर सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे, चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंदर रेड्डी आणि निर्मिती साजिद नाडियाडवाला हे करणार आहेत. ‘सर्कस’ या आणखी एका चित्रपटामध्ये जॅकलिन रणवीर सिंग सोबत दिसणार आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शक असतील.

जॅकलिन आणि अक्षय कुमार या जोडीचा बच्चन पांडे हा चौथा चित्रपट असेल. यापूर्वी ते “हाऊसफुल २”, “हाऊसफुल ३” आणि “ब्रदर्स” मध्ये एकत्र दिसले होते. ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार अभिनेता बनण्याची आस असलेल्या एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कृती सेनॉनदेखील असणार आहे जी एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

हे देखील वाचा