Wednesday, June 26, 2024

श्रीदेवीच्या मृत्यूपूर्वी जान्हवीने आईला सांगितलेले ‘हे’ शेवटचे शब्द, वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

देशाची पहिली लेडी सुपरस्टार श्रीदेवी मृत्यूनंतरही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ‘मॉम’ हा 6 वर्षांपूर्वी 7 जुलैला प्रदर्शित झाला होता. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माता आणि पती बोनी कपूर यांनी या खास दिवशी श्रीदेवीची आठवण काढली. त्याचवेळी मुलगी जान्हवी कपूर हिनेही ‘मॉम’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करून आईची आठवण केली. जान्हवी कपूर अजूनही तो भयानक दिवस विसरलेली नाही, जेव्हा तिला कळले की तिची आई या जगात नाही. 13 ऑगस्ट हा श्रीदेवीचा जन्मदिवस असतो. यानिमित्ताने आपण, जान्हवीने आईला सांगितलेल्या शब्दांविषयी जाणून घेऊयात…

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने सांगितले होते की, जेव्हा तिची आई दुबईला जात होती, त्यावेळी तिचे आईशी बोलणे झाले होते. जान्हवी कपूरने सांगितले होते की, त्यावेळी ती तिच्या ‘धडक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त होती, अशा परिस्थितीत तिला कामामुळे आईसोबत वेळ घालवण्याची संधी कमी मिळत होती.

श्रीदेवीच्या मुलीने सांगितले होते की, “आई दुबईला जाण्याच्या आदल्या दिवशी रात्री मी तिच्या खोलीत गेली होती. कारण, मला झाेप येत नव्हती. मग मी विचार केला की, थोडा वेळ तिच्याशी बोलू. त्यावेळी ती खूप बिझी होती. कारण, ती मोहित मारवाहच्या लग्नाला जाण्यासाठी पॅकिंग करत होती. मला शूटिंगलाही जायचं होतं. मी तिला म्हणाली की, तू ये आणि मला झोपव, पण ती पॅक करत होती. मग ती आली तोपर्यंत मी अर्धी झोपी गेले होते, पण ती माझ्या डोक्यावर थापा मारत मला झाेपवत हाेती, असे मला जाणवत होते.”

“तिच्या आईच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र आले. मात्र, त्याआधी तिला एकटे पणा जाणवत हाेता. अशात कुटुंबाच्या एकजुटीनंतर तिला सुरक्षित वाटू लागले. आम्ही आमची आई गमावली आहे, या नुकसानीची भरपाई होऊ शकत नाही”, असे जान्हवी एका मुलाखतीदरम्यान म्हणाली हाेती. (Bollywood actress jahnvi kapoor last words to her mom sridevi before her death actress revealed about spending last night)

महत्त्वाच्या बातम्या-
बाथटबमध्ये श्रीदेवीला ‘त्या’ अवस्थेत पाहून सुन्न झाले होते बोनी कपूर! वाचा नेमकं काय घडलं होतं ‘त्या’ काळरात्री…
सनी देओल सोडाच, रजनीकांतवरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट

हे देखील वाचा