Sunday, July 21, 2024

करीनाच्या गाण्यावर जान्हवी कपूरचा घायाळ करणारा बेली डान्स, बघा या डान्सचा खास व्हिडिओ

२०१८ साली ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी जान्हवी कपूर खूप कमी वेळात तिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले आहेत. जान्हवी नृत्य देखील तितकेच सुंदर करते. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या जान्हवीने नुकतंच तिचा बेली डान्स करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केला आहे.

श्रीदेवी यांना त्यांच्या अभिनयासोबतच नृत्यासाठीही ओळखले जायचे. त्या सर्व प्रकारचे नृत्य अगदी सहज आणि अतिशय सुंदर पद्धतीने करायच्या. त्यांच्या मुलीनेही त्यांचे नृत्याचे गुण आत्मसात केले आहेत. तिचे डान्समधील कौशल्य तिच्या या व्हिडिओतून सगळ्यांना पाहायला मिळत आहे.

अशोका चित्रपटातील ‘सन सन ननन..’ या गाण्यावर जान्हवीने बेली डान्स केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने शिर्षकांमध्ये लिहिले की, ‘बेली डान्सचे क्लास मिस करत आहे’. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती हा डान्स करत आहे.

जान्हवीच्या चाहत्यांना तिचा डान्स आणि तिच्या डान्स स्टेप्स खूप आवडत आहे. तिच्या लवचिक शरीरामुळे ती ह्या स्टेप्स अगदी लीलया करत आहे. जान्हवीला तिच्या या डान्ससाठी चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्स येत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे फॅन्सला जान्हवीची नृत्य कलेतली निपुणता दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे.

जान्हवी सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. अलीकडेच ती कार्तिक आर्यनसोबत गोव्यात सुट्टी घालवताना दिसली होती. त्यामुळे बॉलिवूडच्या गल्ल्यांमध्ये ही नवीन जोडी त्यात होते आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. शिवाय प्राप्त माहितीनुसार जान्हवीने जुहू मध्ये ३५ कोटीचे घर खरेदी केले असल्याच्या चर्चा आहेत.

जान्हवी आणि कार्तिक आर्यन ‘दोस्ताना २’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. शिवाय काहीच महिन्यांपूर्वी जान्हवीचा गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. आता आगामी काळात जान्हवीचे अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. त्यात दोस्ताना २, रुही अफजाना, गुड लेक जेरी, तख्त या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा