बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जान्हवी तिचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. सध्या अभिनेत्री मुंबईपासून दूर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे आणि तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे का, असा प्रश्न युजर्स करत आहेत.
शेअर केलेल्या या फाेटाेमध्ये जान्हवी कपूर (janhvi kapoor) मालदीवमध्ये असून पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या बिकिनी आणि डेनिम स्कर्टमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि ती नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. पहिल्या फाेटाेत ती हातात नारळ घेऊन कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे, तर इतर दोन फोटोंमध्ये ती तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करत आहे. ही फाेटाे शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ऑन ऍन इसलॅन्ड इन द सन” याआधीही अभिनेत्रीने अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यावर एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियानेही कमेंट केली आहे.
View this post on Instagram
जान्हवी कपूरचा एक्स बॉयफ्रेंड शिखरने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून युजर म्हणतायं की, “दोघेही एकत्र वेळ घालवत आहेत.” एका युजरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शिखरचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “जान्हवी आणि शिखर मालदीवमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत.”
View this post on Instagram
शिखर पहाडिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. शिखर आणि जान्हवी यांनी चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी एकमेकांना डेटही केले होते. मात्र, काही काळानंतर दोघे वेगळे झाले. या वर्षी दिवाळीच्या पार्ट्यांमध्ये दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले होते, त्यानंतर पुन्हा त्यांच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी कपूर लवकरच ‘बवाल’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिची जोडी राजकुमारसोबत दुसऱ्यांदा पडद्यावर दिसणार आहे. (bollywood actress janhvi kapoor celebrating vacation in maldives with ex boyfriend shared new picture in blue bikini)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
काजल अगरवालच्या सिंपल लूकने चोरली लाइमलाइट, फोटोंचा सोशल मीडियावर कहर
जरा इकडे पाहा! नव्या अन् सिद्धांत कारमध्ये दिसले एकत्र; नजर पडताच लाजली बिग बींची नात










