Wednesday, July 3, 2024

कंगना रणौतने तिच्या ‘इमर्जन्सी’साठी ठेवली सर्व संपत्ती गहाण, सोशल मीडियावर स्वतःच केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सतत मीडियामध्ये असते. तिच्या वक्तव्यांमुळे, तिच्या पोस्टमुळे कंगनाला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत असते. लवकरच कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या निमित्ताने कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही गोष्टींचे खुलासे केले आहे. कंगना या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माता आणि दिग्दर्शक अशा भूमिकांमधून दिसणार आहे. हा सिनेमा करताना तिला आलेले सर्व अनुभव कंगनाने तिच्या पोस्टमधून व्यक्त केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाने शूटिंग संपल्यानंतर सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो शेअर करत लिहिले, “मी आज एक अभिनेत्री म्हणून ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या निमित्ताने माझ्या आयुष्यातला एक अभिमानाची वेळ पूर्ण होत आली आहे. वाटताना असे वाटते की माझा हा प्रवास खूपच सहज होता, पण सत्य खूप वेगळे आहे. मी माझ्या मालकीची सर्व संपत्ती गहाण ठेवण्यापासून चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या शेड्युलच्या वेळी मला डेंग्यू झाल्याचे समजेपर्यंत, माझ्या शरीरात रक्तपेशींची संख्या कमी असतानाही शूटिंग करेपर्यंत मी अनेक परीक्षांना सामोरे गेली.”

पुढे कंगनाने लिहिले, “मी नेहमीच सोशल मीडियावर माझ्या भावना अगदी मनमोकळ्या मांडत असते, मात्र या गोष्टी मी कधीच सांगितल्या नाहीत. जे माझी गरज नसतानाही काळजी करतात, ज्यांना मला अपयशी होताना पाहायला आवडते, जे मला त्रास देण्यासाठी प्रयत्नशील असतात, अशा लोकांना मला हे सांगून आनंद द्यायचा नव्हता. मी एक सांगेल आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजोड मेहतच उपयोगी पडते असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे नाहीये. तुम्ही मेहनत जरूर घ्या सोबतच जर तुमच्या कुवतीबाहेर जर तुमची परीक्षा पाहण्यात येत असेल तर तुम्ही खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. हे माझ्यासाठी घडवून आणल्याबद्दल माझ्या अत्यंत प्रतिभावान टीमचे मी मनःपूर्वक आभार मानते.”

कंगनाने तिच्या या पोस्टमध्ये अनेक खुलासे केले आहेत. हा सिनेमा निर्माण करण्यासाठी तिला काय आणि किती मेहनत घ्यावी लागली हे तिने स्पष्ट केले आहे. शिवाय काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात दाखल केला मानहानीचा खटला
ज्येष्ठ रंगकर्मी तथा अभिनेते महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे दुःखद निधन

हे देखील वाचा