Friday, March 29, 2024

नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिस विरोधात दाखल केला मानहानीचा खटला

सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपये फसवणूक प्रकरणात बॉलिवूडच्या दोन बड्या अभिनेत्रींमध्ये युद्ध सुरू झाले आहे. अलीकडेच अभिनेत्री नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिसवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. अशा परिस्थितीत नोराच्या तक्रारीवरून आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. ज्याबाबतीत सध्या एक मोठे अपडेट समोर आले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, नोरा (nora fatehi )हिच्या तक्रारीवरून या प्रकरणाची सुनावणी 25 मार्च रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात होणार आहे. नोराने अलीकडेच प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (jacqueline fernandez) आणि अनेक माध्यम संस्थांविरोधात दिल्ली न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. अशा परिस्थितीत आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस या सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँडरिंग प्रकरणामुळे खूप चर्चेत आल्या हाेत्या.

मात्र, नोराच्या तक्रारीनंतर जॅकलिन फर्नांडिस काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी अभिनेत्री जॅकलिनचे वकील प्रशांत पाटील यांनी नोराचा काही गैरसमज झाल्याचे स्पष्ट केले हाेते. यासोबतच त्यांनी नोराचे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले हाेते. एवढेच नाही तर जॅकलिनच्या वकिलाने असेही म्हटले आहे की, ‘जॅकलीन गरज पडल्यास कायदेशीररित्या नोराविरुद्ध मानहानीचा खटलाही दाखल करू शकते.’

काय आहे नेमके प्रकरण?
सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबत ईडीने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची अनेकदा चौकशी केली आहे, ज्यामध्ये नोराने तिची बाजू स्पष्ट केली होती. मात्र, नंतर जॅकलिन फर्नांडिस आणि मीडिया ट्रायलमुळे तिची प्रतिमा डागाळल्याचा आणि 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरण्यात आल्याचा दावा नोराने केला आहे.(bollywood actress nora fatehi jacqueline fernandez defamation case patiala house court hearing in march)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर निरोपाची वेळ आलीच…माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

ब्रेकिंग! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यााल अटक, अभिनेत्रीला त्रास आणि अश्लील मेसेज पाठवण्याचा लावला आरोप

हे देखील वाचा