Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड हिल स्टेशनवर रेस्टाॅरंट टाकणार हाेती कंगणा, पण ‘या’ अडचणीमुळे अभिनेत्रीचे भंगले स्वप्न

हिल स्टेशनवर रेस्टाॅरंट टाकणार हाेती कंगणा, पण ‘या’ अडचणीमुळे अभिनेत्रीचे भंगले स्वप्न

कंगना राणौत ही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या दमदार चित्रपटांव्यतिरिक्त, तिच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांसोबतच अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलताना दिसते. अशात आता कंगनाने खुलासा केला आहे की, तिने स्वतःचे एक रेस्टॉरंट उघडले होते, पण आर्थिक अडचणींमुळे तिला रेस्टॉरंट बंद करावे लागले. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे.

कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री व्यवसायातही हात आजमावत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, ‘तिला तिचे रेस्टॉरंट अनेक वर्षांपासून उघडायचे होते, परंतु आर्थिक नुकसानीमुळे ती तिचे रेस्टॉरंट उघडू शकली नाही. रेस्टॉरंट सुरू करण्याचे स्वप्न अजूनही स्वप्नच आहे.’

कंगना राणौत शेवटची ‘धाकड’ चित्रपटात दिसली होती. मात्र, तिचा हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. अलीकडेच कंगनाने सांगितले की, ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला तिचे घर गहाण ठेवावे लागले. कारण, या चित्रपटाते दिग्दर्शन आणि मेकींग ती एकटीच करत आहे. ती म्हणाली, मी या शहरात 500 घेऊन आले हाेते. जर मी डुबली तर पूर्णपणे उद्ध्वस्त हाेऊन पहिल्या दिवशी जिथे होते तिथे पुन्हा पोहोचेन.

या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौत दिसणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, विशाक नायर आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. आणीबाणीचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याशिवाय ती ‘चंद्रमुखी 2’ या तेलुगू चित्रपटातही काम करत आहे. (bollywood actress kangana ranaut said she wanted launch restaurant last year but couldn due financial crisis )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू

मधूचंद्राची रात्र साजरी केल्यानंतर सासरी जाताना स्वारा भास्करचे अश्रू अनावर, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा