Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड ‘द केरळ स्टोरी’च्या वादात कंगना राणौतची उडी, दहशतवादाबद्दल बोलली ‘ही’ गोष्ट

‘द केरळ स्टोरी’च्या वादात कंगना राणौतची उडी, दहशतवादाबद्दल बोलली ‘ही’ गोष्ट

कंगना रणौतने ‘द केरळ स्टोरी‘च्या निर्मात्यांना पाठिंबा दिला आहे आणि जे चित्रपटाच्या रिलीजच्या विरोधात आहेत त्यांच्यावर टीका केली आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशात या चित्रपटाच्या ट्रेलरने देशभरात खळबळ उडवून दिली आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्यासाठी काही लोकांनी कोर्टात धाव घेतली आहे.

खरं तर, ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर वादग्रस्त ठरला. कारण, त्यात दावा केला होता की, राज्यातील 32,000 मुली बेपत्ता झाल्या आणि नंतर त्या दहशतवादी गट ISIS मध्ये सामील झाल्या. तेव्हापासून सोशल मीडियापासून ते राजकारणापर्यंत खळबळ उडाली आहे आणि या चित्रपटामुळे देशातील वातावरण बिघडेल, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

अशात अलीकडेच सुरु असलेल्या वादावर कंगनाला तिचे मत विचारण्यात आले. यावर अभिनेत्री म्हणाली, “बघा, मी हा चित्रपट पाहिला नाही. मात्र, चित्रपटावर बंदी घालण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मी आजच वाचलं, जर मी चुकीची असेल तर दुरुस्त करा, पण चित्रपटावर बंदी घालता येणार नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे.”

कंगना आपला मुद्दा पुढे करत म्हणाली, “मला वाटतं की, तो चित्रपट आयएसआयएस शिवाय कोणालाही वाईट किंवा चुकीचं म्हणत नाही आहे. देशातील सर्वात जबाबदार संस्था उच्च न्यायालय असे म्हणत असेल, तर त्यांचे म्हणणे बरोबर आहे. आयएसआयएस ही दहशतवादी संघटना आहे. मात्र, मी त्यांना दहशतवादी म्हणत आहे, असं नाही, तर आपला देश, गृहमंत्रालय आणि इतर देशांनीही त्यांना तेच म्हटलं आहे.”

कंगना पुढे म्हणाली, “जर तुम्हाला वाटत असेल की, ती दहशतवादी संघटना नाही, तर मग तुम्हीही दहशतवादी आहात हे उघड आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, एखादी दहशतवादी संघटना दहशतवादी नाही. त्या संघटनेला कायदेशीर, नैतिकदृष्ट्या, सर्व प्रकारे दहशतवादी घोषित करण्यात आलंय, पण तुम्हाला तसं वाटत नसेल, तर ती चित्रपटाची नाही, तर तुमची समस्या आहे. तुम्ही आधी विचार केला पाहिजे की, तुम्ही आयुष्यात कुठे उभे आहात?”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी अशा लोकांबद्दल बोलत आहे, जे विचार करत आहेत की, हा चित्रपट आयएसआयएस वर नाही, तर त्यांच्यावर हल्ला करत आहे. तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही दहशतवादी आहात. इतकं साधं हे गणित आहे.” अशाप्रकारे कंगनाने मुलाखतीत आपले मत मांडले.

कंगनाच्या वर्कफ्रंट बद्दल बाेलायचे झाले तर, कंगना लवकरच ‘चंद्रमुखी 2’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटा व्यितिरिक्त कंगना ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामध्येही दिसणार आहे.(bollywood actress kangana ranaut supported the kerala story says whoever has a problem with the content of the film is the problem itself )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…

‘सई ताम्हणकर’च्या हटके हेअर स्टाईन वेधले चाहत्यांचे लक्ष, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा