Thursday, April 18, 2024

समलैंगिक विवाहावर कंगना रणौतने तिचे मत मांडत म्हटले, “तुम्ही जगात जे करता त्यामुळे तुमची ओळख…”

मागील काही दिवसांपासून देशात समलैंगिक लग्नाचा मुद्दा खूपच चर्चेत आला आहे. या मुद्द्यावर अनेकांनी समोर येऊन पाठिंबा दिला आहे, तर काहींनी त्याला विरोध केला आहे. यावर अनेक कलाकारांनी देखील त्यांचे मत मांडले आहे. आता देशातील एखाद्या मुद्द्यावर कंगना रणौत तिचे मत मांडणार नाही असे होईल का? यावर कंगनाने देखील तिची भूमिका मांडत या मुद्द्याला पाठिंबा दिला आहे.

नुकतेच कंगना रणौतला या मुद्द्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर तिने त्या मुद्द्यावर आपले मत मांडत म्हटले, “जर दोन लोकांचे हृदय एकत्र आले, तर त्यांच्या पसंतीस काय महत्वाची असते?” याशिवाय तिने याबद्दल एक ट्विट देखील केले आहे. यात तिने लिहिले, “तुम्ही जगात जे करता त्यामुळे तुमची ओळख निर्माण होते. तुम्ही तुमच्या बेडवर काय करता हे महत्वाचे नसते.”

कंगनाच्या या पाठिंब्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे, काहींनी तिच्या मताला दुजोरा दिला आहे. तर काहींनी त्यांचा विरोध दर्शवला आहे. कंगना रणौतसोबतच अप्रूवा असरानी, हंसल मेहता, वीर दास आदी अनेक कलाकारांनी समलैंगिक विवाहाला पाठिंबा दिला आहे. कंगनाने या मुद्द्याला दिलेला पाठिंबा पाहून दिग्दर्शक अपूर्वा असरानीने कंगनाची आभार देखील व्यक्त केले आहे.

कंगनाच्या प्रतिक्रयेनंतर अपूर्वने प्रतिक्रिया देताना तिच्या व्हिडिओला रिट्विट केले आणि तिचे आभार व्यक्त करत म्हटले “बहुतकरून कलाकार हे समलैंगिक विवाहाला खुलेपणाने समर्थन करताना कचरतात. एका क्विव कडून दुसऱ्या क्वीनला धन्यवाद.”

दरम्यान कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच ‘इमर्जन्सी’ सिनेमात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय तिने नुकतीच ‘चंद्रमुखी 2’ सिनेमाची शूटिंग पूर्ण केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा