बॉलिवूडमधून सध्या अनेक बातम्या येत आहेत. कोणाचं लग्न होतंय, तर कोणाचा नवीन चित्रपट येतोय. अशातच आता आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई बनणार आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबासोबतच चाहतेही नवीन पाहुण्याची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. करीनाच्या सोशल मीडिया पोस्ट आणि इंस्टा स्टोरीवरून स्पष्ट होतंय की, ती अजूनही घरीच आहे. तिच्या दुसऱ्या अपत्याच्या जन्माआधीच भेटवस्तू येण्यास सुरुवातदेखील झाली आहे. दरम्यान चाहत्यांकडून अंदाज लावले जात आहेत की, करीनाला मुलगा होईल की मुलगी? अशातच आता एका ज्योतिषाने भविष्यवाणी केली आहे.
करीना कपूर खान आणि तिचा पती सैफ अली खानच्या दुसऱ्या अपत्यासाठी ज्योतिषाने भविष्यवाणी केली आहे. हा तोच ज्योतिषी आहे, ज्याने अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीबद्दल भविष्यवाणी केली होती. आता त्याने करीनाच्या अपत्याबाबत भविष्यवाणी केली आहे की, ती एका मुलीची आई बनणार आहे.
करीनाने ऑगस्ट २०२०मध्ये आपल्या गरोदरपणाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यापूर्वी असे म्हटले जात होते की, करीना फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अपत्याला जन्म देणार होती, परंतु आता वेळ पुढे सरकला आहे. आता ती कोणत्याही वेळी दुसऱ्या अपत्याला जन्म देऊ शकते.
बुधवारी (१७ फेब्रुवारी) करीनाला भेटण्यासाठी तिची आई बबिता आणि बहीण करिश्मा कपूर पोहोचल्या होत्या. त्याचबरोबर काही खेळणी घेऊन जाताना एका व्यक्तीला स्पॉट केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
डिलिव्हरीपूर्वी त्यांच्या घराच्या बाहेर चाहते गुलाबी आणि निळ्या रंगाची पॅकिंग असलेल्या भेटवस्तू पाठवत आहेत. करीनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्येही काही फोटो शेअर केले होते.
नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत करीनाने सांगितले होते की, “यावेळी मी आधीपेक्षा जास्त तयार आहे आणि माझ्यात विश्वास भरलेला आहे. तैमूरच्या जन्मानंतर मी खूप नर्व्हस होते, परंतु यावेळी मी खूप निवांत आहे.”
त्याचबरोबर सततच्या शूटिंगबद्दल बोलताना करीना म्हणाली होती की, “गरोदर महिला काम करू शकत नाहीत का? मी गरोदरपणातही काम केले आहे आणि त्यानंतरही करत राहील. खरं तर मी तर म्हणेल की, गरोदरपणात हालचाल केल्याने बाळाची तब्येत चांगली राहते.”
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुपरहिट सिनेमे दिलेली बॉलीवूड अभिनेत्री तिसऱ्यांदा होणार आई, फोटो पोस्ट करत दाखवले बेबी बंप-तमिळ अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोशूटने कियारा आडवाणीलाही टाकले मागे; फोटो होतायत जोरदार व्हायरल