करीना कपूर ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीचा ‘कभी खुशी कभी गम‘ हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात तिने पूजा उर्फ ”पू” ही व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेची बरीच चर्चा देखील झाली हाेती. अभिनेत्रीच्या या व्यक्तिरेखेचे अनुकरण लोक आजही अनेकदा करताना दिसतात. अशात नुकतीच करीना तिच्या या व्यक्तिरेखेबद्दल बोलली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…
खरे तर, एका मुलाखतीदरम्यान, करीना कपूर (kareena kapoor) हिने तिच्या आइकॉनिक पात्र ‘पू’बद्दल सांगितले. ती म्हणाली की, “पू हे एक आइकॉनिक कॅरेक्टर होते. काही पात्रांना कधीही स्पर्श करू नये. ते जसे आहेत तसे त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे.” ती पुढे म्हणाली की, “कोणीही ‘पू’ची भूमिका साकारु शकत नाही आणि त्यांनी असे करूही नये.” ‘पू’ चा बोले चुडियांचा आउटफिट आजही माेठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे, असेही तिने नमूद केले.
View this post on Instagram
करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर करीना अखेरची आमिर खानसोबत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. या चित्रपटाला लोकांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. अशात करीना लवकरच ‘द क्रू’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. या चित्रपटात करिनाव्यतिरिक्त क्रिती सेनन आणि तब्बूही दिसणार आहेत. याशिवाय करीना लवकरच हंसल मेहता यांच्या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटोही शेअर केले आहेत.(bollywood actress kareena kapoor talk about kabhi khushi kabhi gham film iconic character poo said no one can play that role)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…
‘त्या एका कॉलने माझं लाईफ…’ अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केलेली “ती” पोस्ट चर्चेत