Tuesday, March 5, 2024

सैफच्या आधी अमृता पडली हाेती ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात; प्रकरण लग्नापर्यंतही पाेहाेचले हाेते, पण…

प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंग चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. अमृता सिंग हिने आपल्या अभिनय आणि साैंदर्यांच्या बळावर चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले. अभिनेत्रीने आपल्या अभिनय काराकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट दिले. मात्र, तरीदेखील अभिनेत्रीच्या आयुष्यात एकटेपणा राहिला. खरे तर अभिनेत्रीने सैफ अली खानसोबत प्रेमविवाह केला होता, पण नंतर त्यांचा घटस्फाेट झाला.

माध्यमातील वृत्तांनुसार, सैफ अली खानसोबत लग्न होण्यापूर्वी अमृता सिंग (amrita singh) हिचे एकदा नव्हे, तर अनेकदा प्रेम भंग झाले. माध्यमातील वृत्तांनुसार, अभिनेत्री पहिल्यांदा सनी देओलच्या प्रेमात पडली होती. मात्र, सनी विवाहित होता. हे जेव्हा अभिनेत्रीला कळले तेव्हा तिला चांगलाच माेठा धक्का बसला.

याशिवाय अमृता सिंग क्रिकेटर रवी शास्त्रीसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत होती. माध्यमातील वृत्तांनुसार, रवी शास्त्री आणि अमृता सिंग लग्न करणार होते. मात्र, रवीची अट होती की, लग्नानंतर अमृता चित्रपटात काम करणार नाही. रवीची ही गोष्ट अमृता सिंगला मान्य नव्हती आणि त्यामुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. मात्र, प्रकरण इथेच थांबले नाही, तर अमृता सिंग पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात पडली. माध्यमातील वृत्तांनुसार, रवी शास्त्रीनंतर अमृताची अभिनेता विनोद खन्नासोबत जवळीक वाढली. ‘बंटवारा’ चित्रपटात ही अभिनेत्री विनोदसोबत काम करत होती. मात्र, इथेही अमृताचे मन दुखावले गेले. कारण, विनोद खन्ना आधीच विवाहित होते आणि वयातही ते अमृता सिंगपेक्षा खूप मोठे होते. तसेच अमृताच्या आईलाही हे नाते मान्य नव्हते. यामुळेच अमृताचे विनोद खन्नासोबत लग्न होऊ शकले नाही.

मंडळी, अमृताने 1991मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केले होते. मात्र, 13 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. अमृताला सैफपासून दाेन मुले आहेत. सारा अली खान अन् इब्राहिम अली खान.(according to reports bollywood actor saif ali khan ex wife amrita singh was about to marry vinod khanna read what went wrong)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गोल्डी ब्रारनेच पाठवला सलमानला धमकीचा मेल, पोलिसांनी युके सरकारला पाठवले लेटर ऑफ रिक्वेस्ट

दु:खद! ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरच्या वडीलांचे निधन, मुलाला सहना हाेईना वेदना

हे देखील वाचा